आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूमाफियांनी तहसीलमधून पळविले वाळूचे 10 ट्रक, मालेगावमधील प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - अपर जिल्हाधिकाऱ्यांनी  विनापरवाना वाळू वाहतूक करणारे दहा ट्रक जप्त केले हाेते. ट्रकमालकांना नाेटिसा बजावून दंड भरण्याच्या सूचना करण्यात  अाल्या हाेत्या. मात्र, निर्ढावलेल्या व मुजाेर वाळूमाफियांनी दंडाची रक्कम न भरता मंगळवारी पहाटे थेट तहसीलच्या अावारात उभे असलेले दहा ट्रक पळवून नेले. या प्रकरणी महसूल विभागाने ट्रकमालक व चालकांविराेधात  छावणी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला अाहे.


जळगाव, अमळनेर, धुळे, नंदुरबार भागातून मनमाड, अहमदनगरकडे शासनाचा महसूल बुडवून माेठ्या प्रमाणावर  वाळू वाहतूक हाेत असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना मिळाली हाेती. राऊत यांनी देवळ्याचे तहसीलदार कैलास पवार, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी व किल्ला पाेलिसांच्या संयुक्त पथकाद्वारे १३ व १७ मार्चला मनमाड चाैफुली तसेच वऱ्हाणे शिवारात कारवाई करून दहा वाळूचे ट्रक ताब्यात घेतले हाेते. रितसर पंचनामे करून सदर ट्रक येथील तहसीलच्या अावारात उभे  करण्यात अाले हाेते. ट्रकमध्ये ७७ ब्रास वाळू अाढळून अाली हाेती. बाजारभावाच्या पाचपटीप्रमाणे ४४ लाख ६५ हजार ५२५ रुपये दंड करण्यात अाला हाेता. दरम्यान, दंडवसुलीची प्रक्रिया सुरू असतानाच मंगळवारी पहाटे तहसील अावारातून सर्व दहा ट्रक पळवून नेण्यात अाले. प्रारंभी दंड वसुलीसाठी ट्रक देवळ्यात नेण्यात अाल्याची चर्चा हाेती. मात्र, महसूलच्या अधिकाऱ्यांनी याची खात्री केली असता ट्रक वाळूमाफियांनीच पळवून नेल्याचे समाेर अाले.  तहसीलदार ज्याेती देवरे यांनी घटनेची माहिती अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना दिली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.

 

बातम्या आणखी आहेत...