आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताहाराबाद येथे अाेव्हरटेक करताना बसला अपघात; ११ प्रवासी जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताहाराबाद- येथील इंडियन ऑइल पेट्रोलपंपांजवळ एसटीला डंपरनेे हुलकावणी दिल्यामुळे झालेल्या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर ताहाराबाद येथे प्राथमिक उपचार चालू आहेत. 


नंदुरबार येथून नाशिककडे जाणाऱ्या नंदुरबार आगाराची बस (एम.एच. २० बीएल २३१०) कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या डंपरने हुलकावणी दिल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत उतरल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. यात संगीता पोपट बत्तासे (४६, रा. सटाणा), संगीता महेंद्र चौधरी (४०, रा. नाशिक), जागृती संतोष भदाणे (२७), संतोष अशोक भदाणे (रा. पिंपळनेर), छाया साळवे (२३), गुरुदास ठाकरे (२३, रा. नवापाडा), सुमनबाई साहेबराव अहिरे (५५, रा. चिंचखेड), शोभा भिका अहिरे (४५, रा. कोपर्ली), शैला दिलीप पाटील (६०), दिलीप माेतीराम पाटील (६३, रा. कल्याण), गुलाबराव पाटील (६८) जखमी झाले. जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाठक, ताहाराबाद येथील खासगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. नितीन पवार, डॉ. डी. एस. महाजन, डॉ. जे. पी. ब्राह्मणकार, राजू सावंत तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन जखमींवर प्राथमिक उपचारासाठी मदत केली. 

बातम्या आणखी आहेत...