आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरिंगच्या 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश, तिसऱ्या फेरीसाठी मंगळवारी जागावाटप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - इंजिनिअरिंग पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू असून, पहिल्या दोन कॅप राउंडनंतर नाशिक विभागात ११ हजार ४१७ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. शुक्रवारी (दि. १३) तिसऱ्या कॅप राउंडसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना सोमवार (दि. १६) पर्यंत ऑप्शन फॉर्म भरण्याची विहित मुदत आहे. त्यानंतर मंगळवारी (दि. १७) जागावाटप होणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १८ ते २० जुलै या कालावधीत एआरसी सेंटरवर जाऊन रिपोर्टिंगद्वारा प्रवेश निश्चित करण्याची मुदत आहे.

 

इंजिनिअरिंगच्या पहिल्या दोन फेऱ्यांत ११ हजार ४१७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. इंजिनिअरिंगच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत यंदा प्रवेश अर्जांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही. नाशिक विभागात इंजिनिअरिंगच्या ५० महाविद्यालयांत १८ हजार ५२० जागा उपलब्ध असून, त्यासाठी १७ हजार ८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले अाहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांचे अर्ज कमी असल्याने सुमारे दीड हजार जागा रिक्त राहणार आहेत. तिसऱ्या कॅप राउंडसाठी १७ जुलै रोजी जागावाटप झाल्यानंतर १८ ते २० रोजी विद्यार्थ्यांना एआरसीवर जाऊन रिपोर्टिंग करून प्रवेश निश्चित करावे लागतील. इंजिनिअरिंगच्या ८ हजार जागा रिक्त असून विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी आहे. तिसऱ्या फेरीचे जागा वाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांना फ्रीज व नॉट फ्रीज या पद्धतींद्वारे प्रवेश निश्चित करावयाचा आहे. तसेच, आपल्या पसंतीची शाखा व महाविद्यालय मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश फ्रीज (निश्चित) करून ठेवायचा आहे.

बातम्या आणखी आहेत...