आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- एसटी कामगारांचा गेल्या २४ महिन्यांपासून नवीन करार रखडला आहे. वाढत्या महागाईच्या काळात अत्यंत कमी वेतनात काम करावे लागत असल्याने दिवसेंदिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. वेतन कराराबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने नाशिक विभागातील पंचवटी डेपोच्या १२३ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छामरणाची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले.
तुटपुंज्या वेतनावर काम करणे व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे अार्थिक व मानसिक खच्चीकरण होत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून वेतनवाढीबाबत ठोस पाऊल उचलले जात नसल्याने ते हताश अाहेत. याच पार्श्वभूमीवर पंचवटी अागारातील संग्राम बोडके, उद्धव वाघमारे, सचिन शिंदे, अरुण शेलार, गोविंद चरकेवाड, समाधान माेगल, रवींद्र साळवे, सिद्धेश शेलार यांच्यासमवेत १२३ कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे स्वेच्छामरणाची मागणी केली. स्वेच्छामरणाच्या मागणीचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे यांना पाठवण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.