आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारची काच फोडून १५ लाखांचा ऐवज लंपास; नाशिकराेड येथे सराफाच्या दुकानाजवळील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- दत्तमंदिर रोडवरील सराफी दुकानाजवळ उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे १५ लाख रुपयांचा एेवज चोरून नेला. दिवसाढवळ्या आणि वर्दळ असलेल्या रस्त्यावर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 


याबाबत उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्त मंदिररोडवर अभय शहाणे यांचे मे. शहाणे सराफ दुकान असून गुरुवारी (दि. ७) दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहाणे त्यांच्या कारमधून (एम. एच. १७ ए. टी. ७) दुकानात आले. कार त्यांनी दुकानाच्या बाजूलाच उभी केली होती. कारमधील बॅगमध्ये दीड लाख रुपये व साडेबारा लाखांचे दागिने होते. गाडीमध्ये कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून रोख रक्कम आणि दागिने असलेली बॅग घेऊन पोबारा केला. ही घटना काही वेळानंतर शहाणे यांच्या लक्षात आली असता त्यांनी तत्काळ उपनगर पोलिसांना कळविले. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चार वर्षांपूर्वीही शहाणे यांच्या सराफी पेढीवर काही हल्लेखोरांनी गोळीबार करीत सराफी पेढी लुटण्याचा प्रयत्न केला होता. 


चाेरांचा लवकरच शाेध 
दत्त मंदिररोडवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून लवकरच त्यांना ताब्यात घेऊ. 
-मोहन ठाकुर, सहाय्यक पोलिस आयुक्त 

बातम्या आणखी आहेत...