आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार उलटून झालेल्या अपघातात खामगावातील 2 जण जागीच ठार; 2 जण गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड (जि. नाशिक)-  कारचे पुढील चाक पंक्चर झाल्यानंतर ती उलटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

 

चांदवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पवनकुमार लेखवानी (वय 22) व हर्षद कांचन खांनचंदानी (वय 22, दोघे रा. सिंधी कॉलनी, खामगाव जि. बुलढाणा) यांचा या अपघातात जागीच मृत्यु झाला. तर लखन मनीष पेशवानी (वय 22) व सनी दीपक पेशवानी (वय 23, रा. खामगाव) हे दोघे जखमी झाले. मालेगाव -मनमाड राज्य महामार्गावर शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना तातडीने जवळील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात झालेले चारही जण रात्री खामगाव येथून खासगी वाहनाने भुसावळ येथे आले. नातेवाइकांची स्विफ्ट कार घेऊन ते पहाटे शिर्डी येथे दर्शनासाठी जात असताना धावत्या स्विफ्ट कारचे चाक पंक्चर झाल्याने गाडी उलटून हा अपघात झाला. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...