आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ ‘हॅक’ करून फोडला पेपर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून त्यावरून गणिताची प्रश्नपत्रिका काढून ती सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या दोन संशयित विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारीनुसार, संशयित आदेश गजेंद्र चोपडे (रा.  खुटवडनगर) व चिन्मय दीपक अट्रावलकर (रा. नाशिक) यांनी परीक्षेच्या एक दिवस आधी संकेतस्थळ हॅक करून प्रश्नपत्रिका मिळवली व ती सोशल मीडियावर व्हायरल केल्याची माहिती विद्यापीठाने केलेल्या तपासातून पुढे आली.

 

व्हायरल झालेला पेपर अाणि विद्यार्थ्यांना दिलेला पेपर हा सारखाच असल्याचे निदर्शनास आले.  कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी प्रा.डॉ.व्ही.बी.गायकवाड, प्रा.डॉ. ए.व्ही. पाटील, परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ.राजेंद्र तलवारे यांची त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली होती. या समितीने परीक्षा केंद्रांना भेट देऊन विद्यार्थ्यांकडे चौकशी केल्यानंतर एका अभियांत्रिकी महाविद्यालयात चतुर्थ वर्षाला शिक्षण घेणारे चोपडे अाणि अट्रावलकर यांची नावे समोर आली.  

बातम्या आणखी आहेत...