आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामात दिरंगाई अाणि कुचराई; नाशिक महापालिकेत २२ अभियंत्यांच्या तडकाफडकी बदल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कामात दिरंगाई अाणि कुचराई करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू असतानाच अाता पालिकेतील अभियंत्यांचे बदलीसत्र सुरू करण्यात अाले अाहे. या बदल्या करताना तातडीने संबंधित जागेवर रुजू हाेण्याचे अादेश अायुक्तांनी दिले अाहेत. महत्त्वाचे म्हणजे बदली रद्द करण्यासाठी काेणी राजकीय दबावतंत्राचा वापर केल्यास त्यावर तडक शिस्तभंगाची     कारवाई करण्यात येणार अाहे. अातापर्यंत २२ अभियंत्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात अाल्या अाहेत. 


पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांची बदली नगररचना विभागात करण्यात आली आहे. प्रभारी शहर अभियंता संजय घुगे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग सोपविण्यात आला आहे. 


शिवाजी चव्हाणके यांच्याकडे पंचवटी, पूर्व व नाशिकरोड विभाग पाणीपुरवठा तर नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग चव्हाण यांच्याकडे पश्चिम, सिडको व सातपूर पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामसिंग गांगुर्डे यांच्याकडे नाशिकरोड, सिडको व सातपूर बांधकाम विभाग सोपविण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त एस. एल. अग्रवाल यांची बदली नगररचना विभागात करण्यात आली. नितीन राजपूत सातपूर मलनि:सारण विभाग, डी. वाय. माळवाळ यांची बांधकाम विभागात बदली करण्यात आली. नितीन पाटील यांची बदली नगररचना विभागात तर राजेंद्र शिंदे यांच्याकडे पूर्व विभागाच्या मलनिस्सारण विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला. प्रशांत पगार यांची बदली ट्राफिक सेलमध्ये करण्यात आली आहे. एस. जे. जाधव यांच्याकडे पंचवटी विभागाच्या पाणीपुरवठा (यांत्रिकी) विभागाचा कार्यभार देण्यात आला. अनिल नरसिंगे यांची बदली नगररचना विभागातून सिडको बांधकाम विभागात करण्यात आली. 


सी. बी. आहेर यांची बदली पाणीपुरवठा (मुख्यालय) विभागात करण्यात आली. सुनील रौंदळ यांच्याकडे गुणवत्ता व नियंत्रण विभाग देण्यात आला. एस. इ. बच्छाव यांची बदली पश्चिम विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागात करण्यात आली. 


राजेंद्र पाटील यांची बदली पंचवटी बांधकाम विभागात करण्यात आली. राजकुमार खैरनार यांची बदली मलनिस्सारण विभागात करण्यात आली. भीमा खोडे यांच्याकडे पश्चिम कार्यालयात मलनिस्सारण विभागात करण्यात आली. व्ही. डी. माडीवाले यांच्याकडे नगररचना विभागाचा कार्यभार देण्यात आला. दौलत घुगे यांच्यावर सिडको विभागीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात अाली अाहे. 

 

बातम्या आणखी आहेत...