आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात २६.४ मिलिमीटर पाऊस; विजांच्या कडकडाटासह जाेरदार सरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंतही मान्सूनचे अागमन न झाल्याने हिरमाेड झालेल्या नाशिककरांना बुधवारी (दि. २०) मान्सूनपूर्वच्या दमदार सरींनी काहीसा दिलासा दिला. दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास २६.५ मिलिमीटर पाऊस काेसळला. शहरातील रस्त्यांसह मैदानांवर जागोजागी पाणी साचले होते. 


मान्सून तळकोकणामध्ये सक्रिय झाल्याने शहरासह जिल्ह्यात वेळेवर दाखल होण्याच्या अाशेने समाधानाचे वातावरण होेते. मात्र, नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह अचानक थांबल्याने मान्सूनही थबकला. त्यामुळे जून समाप्तीकडे जात असतानाही जिल्ह्यात मान्सून दाखल झालेला नाही. बुधवारी मात्र मान्सूनपूर्वीच्या पावसाने वाढत्या उकाड्यापासून शहरवासीयांना दिलासा मिळाला. 


शहरासह जिल्ह्यामध्ये गत आठवड्यापासून ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. बुधवारी दुपारी शहरात काळे ढग दाटून आले होते. काही ठिकाणी विजांचा कडकडाट अाण ढगांचा गडगडाटही झाला. पावसाची चाहूल लागल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसू लागला. दुपारी मेरी, म्हसरूळ, मखमलाबाद, पंचवटी, कामटवाडे, सिडको, सातपूर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, जेलरोड, विहितगाव, पाथर्डी, गंगापूररोड, काॅलेजराेड, महात्मानगर या परिसरात २०-२५ मिनिटे जोरदार पाऊस झाला. देवळाली कॅम्प येथे मंगळवारी रात्रीही जोरदार पाऊस झाल्याने लामरोड परिसरात पाणी साचले होते. 

बातम्या आणखी आहेत...