आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात अात्तापर्यंत २८ टक्के पीककर्जाचे वाटप; राष्ट्रीयीकृत बँकांद्वारे सर्वाधिक कर्जांचे वितरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- खरीप हंगाम सुरू झाला असला तरी जिल्ह्यात अात्तापर्यंत केवळ २७.९१ टक्के पीककर्जाचे वितरण झाले अाहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागाची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या व गत दीड वर्षापासून अार्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लक्ष्यांकाच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे ६२.९८ टक्के पीककर्जाचे वितरण पूर्ण केले अाहे. जिल्हा बँक अडचणीत असल्याने यंदा माेठी जबाबदारी येऊन ठेपलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांनीही ६ जुलैपर्यंत २४.८० टक्के कर्ज वितरण केले अाहे. जे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणावे लागेल. 


सन २०१८-१९ च्या खरीप हंगामाकरिता राष्ट्रीयीकृत बॅँकांना १८५९ काेटी ९२ लाख रुपयांचे लक्ष्यांक मिळालेले असून ग्रामीण बॅँकांना तेच १३ काेटी ४३ लाख रुपये अाहे. खासगी बॅँकांना ४०४ काेटी ६५ लाख तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ३४७ काेटी ८० लाखांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट अाहे. एकूणच या उद्दिष्टांचा विचार केल्यास ६ जुलैपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी १६,१३० सभासदांना ४६१ काेटी ३२ लाखांचे पीककर्ज वितरण पूर्ण केले अाहे. ग्रामीण बँकांनी केवळ ६८ सभासदांना एक काेटी ५ लाख रुपयांचे तर खासगी बँकांनीही अवघ्या २९५० सभासदांना ५१.३१ काेटी रुपयांचे कर्ज वितरण केले अाहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १६,१०२ सभासदांना अात्तापर्यंत २३९ काेटी ८४ लाख रुपयांचे पीककर्ज वितरण पूर्ण केले अाहे. एकूणच या सर्व बँकांचा विचार केल्यास राष्ट्रीयीकृत बँक अाणि जिल्हा बँकेने वितरण केलेल्या सभासदांची संख्या जवळपास सारखी असली तरी राष्ट्रीयीकृत बँकांची कर्ज वितरणाची रक्कम माेठी अाहे.


बँकांचा वेग वाढण्याची अपेक्षा 
खरीप हंगामाचा पहिला महिना संपला असताना अाणि शेतकऱ्यांची मशागत सुरू असताना त्यांना भांडवल उपलब्ध हाेणे महत्त्वाचे अाहे. यासाठी जिल्हा बँक अडचणीत असताना राष्ट्रीयीकृत अाणि खासगी बँकांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज व्यक्त हाेत अाहे. मात्र, अात्तापर्यंत या राष्ट्रीयीकृत बँकांनी उद्दिष्टाच्या केवळ २४.८० टक्के तर खासगी बँकांनी मात्र १२.६८ टक्के पीककर्ज वितरण केलेले असल्याने या बॅँकांना कर्ज वितरणाचा वेग वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवृत्त करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त हाेत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...