आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात 3 मिलिमीटर पाऊस, तपमान अाले 26 अंशांवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - शहरात गत चार दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कमाल तपमानात घट झाली असून शनिवारी कमाल तपमान २६.५ अंश सेल्सिअस तर किमान २२.६ अंश सेल्सिअस असे नाेंदले गेले.

 

महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने शनिवार आणि रविवार अशा सलग सुटीचा शासकीय आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांना सायंकाळच्या पावसामुळे आनंद घेता आला नाही. शहरात सलग तीन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे दोन ते तीन टप्पे झाले. त्यामुळे अधूनमधून सूर्यदर्शनदेखील घडत होते.

 

हवामान खात्याने १७ जुलै रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यात मात्र इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत दररोज मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असून इतर तालुक्यांमध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस सुरू असल्याने धरणांच्या जलसाठ्यात वाढ हाेत असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता कमी झाली अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...