आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढीसाठी राज्यातून ३७८१ बसेस, प्रवाशांसाठी उभारणार तीन बसस्थानके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पंढरपूर येथे अागामी आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने वारकरी, भाविक येत असतात. या भाविकांच्या वाहतुकीच्या दृष्टीने एसटी महामंडळातर्फे राज्याच्या विविध भागांतून ३७८१ बसेस सोडण्यात येणार आहेत. यात्रेनंतर परतीच्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेत स्त्रिया व आबालवृद्धांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून एकूण जादा बसेसपैकी १० टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेच्या नियोजनासंदर्भात पुणे येथे शुक्रवारी (दि. २२) परिवहनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित देओल यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकारी व सर्व जिल्ह्यांचे विभाग नियंत्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत नियाेजनासंदर्भात महत्वाची बैठक पार पडली. 


या बैठकीत २१ जुलै रोजी बाजीराव विहीर येथे होणाऱ्या रिंगण सोहळ्याला भाविक-प्रवाशांना जाण्यासाठी एसटी महामंडळाने पंढरपूर येथून १०० जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. या जादा बसेस दिवसभर या मार्गावर प्रवाशांची ने-आण करणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. पंढरपूरहून ७ किमी अंतरावर असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे बसस्थानकावर जाण्यासाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. याचा फायदा नाशिक विभागातील भाविकांना हाेणार अाहे. 


परतीच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण उपलब्ध 
पंडरपूरच्या अाषाडी यात्रेनंतर भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी हाेणारी गर्दी लक्षात घेऊन स्त्रिया व आबालवृद्धांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून जादा बसेसपैकी सुमारे १० टक्के जागा आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व ्वयवस्तापनकीय संचालक रणजित देअाेल यांनी दिली. आगाऊ आरक्षण केल्यास आसन निश्चित होऊन प्रवास सुखकर होण्यास मदत होते. यासाठी सर्व प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन आरक्षण करावे. त्याचबरोबर msrtc reservation mobile app चा वापर करावा, असे आवाहन एस.टी. महामंडळाच्या वतीने करण्यात आले अाहे. 


उभारली जाणार तीन तात्पुरती बसस्थानके 
आषाढी यात्रेला मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठलभक्तांना सुरक्षितरित्या प्रवास घडवून आणण्यासाठी २१ ते २८ जुलै या यात्राकाळामध्ये एस.टी.चे ८ हजार कर्मचारी अहोरात्र सेवा देणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे तीन तात्पुरत्या बसस्थानकांची निर्मिती करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील प्रवाशांसाठी भीमा बसस्थानक, पुणे-मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी चंद्रभागानगर बसस्थानक व जळगाव-नाशिक येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी पंढरपूरजवळील विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे बसस्थानक उभारण्यात येत आहे. तीनही बसस्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, विद्युत सेवा, फिरती स्वच्छतागृहे, उपाहारगृह, रुग्णवाहिका, प्रत्येक विभागनिहाय चौकशी कक्ष, संगणकीय उद‌्घाेषणा या सुविधा देण्यात येणार आहेत. तिन्ही बसस्थानकांवर यात्राकाळातील हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...