आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काचेचे ४० शीट अंगावर काेसळले, जखमी कामगाराचा रुग्णालयात मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- काचांचे ४० शीट अंगावर पडल्याने त्याखाली अडकलेल्या कामगाराला अग्निशामक दलाच्या जवानांनी 'हँजमेट' बंबाच्या साह्याने बाहेर काढले, मात्र खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सारडा सर्कल येथील ग्लास मेकर्स दुकानात गुरुवारी (दि. १९) दुपारी हा अपघात घडला होता. 


अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार सारडा सर्कल परिसरातील ग्लास मेकर्स या दुकानात काचांच्या फर्निचरचे काम केले जाते. दुपारी साबीर अली हा कामगार दुकानात काम करत असताना अचानक काचांचे शीट खाली कोसळले. ४० शीटांच्या खाली साबीर अडकल्याने त्यास वाचवण्यासाठी इतर कामगारांनी धाव घेतली मात्र अवजड असलेल्यार काचा हटवण्यास वेळ झाला. तत्काळ अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. काही वेळातच दलाचा 'हँजमेट' बंग दाखल झाला अग्निशामक दलाने या अत्याधुनिक बंबाच्या साह्याने काचा वर करत या कामगाराची सुटका केली. कामगाराचा श्वास गुदमरू नये म्हणून त्याला कृत्रिम ऑक्सिजन पुरवण्यात अाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी हायड्रॉलिक स्टूल च्या साह्याने काचांचे शीट अलगद वर घेतले. एक तासांच्या प्रयत्नानंतर दबलेल्या कामगाराला सुखरुप बाहेर काढले. १०८ रुग्णवाहिकेतून त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले. दलाचे डी. बी. गायकवाड, ए. एस. पोरजे, एस. डी. राऊत, मंगेश पिंपळे, उदय शिर्के, राजेंद्र पवार, अनिल गांगुर्डे, तानाजी भास्कर, घनश्याम इंपाळ, नितीन म्हस्के, यांनी विशेष परिश्रम घेत कामगाराला बाहेर काढले हाेते. 


अत्याधुनिक बंबाचा वापर 
काचांच्या शीटखाली दाबलेल्या कामगाराला वाचविण्यासाठी अग्निशामक दलाने वेळीच खबरदारी घेत अत्याधुनिक बंबाचा वापर केला. अरुंद जागा असूनही जवानांनी हायड्रॉलिक स्टूल आणि कटरच्या साह्याने काचांचा ढिगारा दूर करत कृत्रिम ऑक्सिजन देत या कामगाराला बाहेर काढले हाेते. 


रेस्क्यू आॅपरेशन असे 
अग्निशमन दलाकडून रेस्क्यू आॅपरेशन दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू करण्यात आले. पत्र्याचे दुकान आणि परिसरात जमलेली गर्दी तसेच फुटलेल्या काचांमुळे बचावकार्यात मोठ्या प्रमाणात अडथळे येत हाेते. लिफ्टिंग बॅग काचेच्या ढिगाखाली ठेवून तत्काळ जवानांनी त्यामध्ये गॅस भरण्यास सुरुवात केली. यामुळे कामगाराच्या अंगावर असलेला भार वरच्या दिशेने उचलला गेला. मात्र त्याच्या पायाच्या बाजूने काही काचेचे शीट पडलेले असल्याने त्याखाली पाय अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी इलेक्ट्रॉनिक कटरचा वापर करून काचेचे शीट कापले. अत्यवस्थ स्थितीतील गंभीर जखमी झालेल्या कामगाराला बाहेर काढण्यास तासाभरानंतर यश आले. परंतु रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. 


असे आहे हँजमेट बंबाचे कार्य 
हँजमेट बंब अपघातात, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या, अवजड वस्तू अंगावर पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी वापरला जातो. यात हायड्रॉलिक स्टूल, कटरचा वापर करतात. अाॅक्सिजन सिलिंडरद्वारे श्वास दिला जातो. वेगवेगळ्या इक्विपमेंटचा वापर केला जाताे. या बचाव कार्यात दलाने या बंबाचा योग्य वापर करत कामगाराला बाहेर काढले हाेते. 

बातम्या आणखी आहेत...