आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी दिली जिल्ह्यात एमबीएकरिता सीईटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एमबीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शनिवारी व रविवारी ऑनलाइन सीईटी परीक्षा घेण्यात आली. पहिल्याच दिवशी ३ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी शहरातील पाच केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. तीन हजारावर विद्यार्थी सीईटीसाठी प्रविष्ट होते. दोन दिवसात एकूण सहा हजारावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डीटीईतर्फे या सीईटीचा निकाल जाहीर होणार आहे.

 

एमबीएसाठी शनिवारी परीक्षा झाल्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांसाठी रविवारी (दि. ११) रोजी पाच केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. एमबीएच्या प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. एमबीएसाठी सी-मॅट, तंत्रशिक्षण विभागातर्फे डीटीई एमबीए सीईटी आणि कॅट या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. कोणतीही एक सीईटी परीक्षा दिल्यानंतर त्यानुसार प्रवेश मिळू शकेल. या तीन परीक्षांचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यातील पहिली सीईटी परीक्षा २० जानेवारीला घेण्यात आली होती. कॅट, सी मॅट व महाराष्ट्र डीटीई एमबीए एमएमएस सीईटी या तिन्ही परीक्षांपैकी कॅट व सी मॅट या परीक्षा झाल्या आहेत. डीटीईतर्फे १० व ११ मार्च रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. मे २०१८ मध्ये परीक्षेचा निकाल जाहीर होईल. एमबीए अभ्यासक्रमाची शहरात २५ महाविद्यालये असून १३०० हून अधिक जागा उपलब्ध आहेत. शहरातील संदीप फाउंडेशन, सपकाळ कॉलेज, वडाळा आयवो डिजिटल झोन, मेट कॉलेज आणि संगमनेर येथील केंद्रांवर सीईटी घेण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...