आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याला ६८६ काेटींची 'कर्जमाफी'; दाेन लाख ५६ हजार ५५६ शेतकऱ्यांना मिळाला लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्य शासनाने गतवर्षी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना' अाणली हाेती. या याेजनेमधून ९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ५६ हजार ५५६ शेतकऱ्यांना लाभ मिळाला अाहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंॅक अाणि इतर बॅँकांना या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, प्राेत्साहन अनुदान यापाेटी ६८६ काेटी ६४ लाख ९६हजार रुपयांचा निधी मिळाला अाहे. यापैकी सर्वाधिक ५८० काेटी ५४ लाख ६३ हजारांचा निधी एकट्या जिल्हा बँकेला मिळाला अाहे. जिल्हा बँकेच्या १ लाख १४ हजार ६९१ खातेदारांना अात्तापर्यंत या कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे समाेर अाले अाहे. 


गतवर्षी विराेधकांच्या रस्त्यावरील संघर्ष यात्रा अाणि विधिमंडळातील कर्जमाफीची जाेरदार मागणी, शेतकऱ्यांची अांदाेलने या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ही कर्जमाफी याेजना अाणली हाेती. तिला कर्जमाफी नाव न देता शेतकरी सन्मान याेजना असे नाव दिले गेले हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत या याेजनेचा लाभ पाेहाेचेल, असे स्पष्ट केले हाेते. यामुळेच या याेजनेला अात्तापर्यंत तीन वेळा मुदतवाढही दिली गेल्याचे मानले जाते. शासनाच्या या याेजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, २५ हजारांपर्यंतचे प्राेत्साहन अनुदान अाणि दीड लाखावरील थकीत कर्जाची रक्कम भरल्यास दीड लाख रुपयांचे कर्ज माफ अशा तीन प्रकारांत शेतकऱ्यांना लाभ मिळत अाहे. 


मालेगाव तालुक्याला सर्वाधिक लाभ 
जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ९० काेटी ९५ लाख रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ ३५ हजार ९६८ शेतकऱ्यांना मिळाला. अादिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या पेठ तालुक्यात केवळ ३ हजार ९१५ शेतकऱ्यांना ५ काेटी २८ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला अाहे. मालेगाव पाठाेपाठ सटाणा तालुक्यातील २५ हजार ९३ शेतकऱ्यांना ७३ काेटी ७५५ लाखांचा तर येवला तालुक्यातील २२ हजार ४५८ शेतकऱ्यांना ५५ काेटी २३ लाख ९८ हजार रूपयांचा लाभ मिळाला अाहे. लाभाची ही रक्कम हे खातेदार ज्या बँकांचे सभासद अाहेत, त्यांच्या खात्यात शासनाने वर्ग केलेली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...