आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला जिवे मारण्याची धमकी देत तो घरात घुसला, पत्नीकडे केली अशी मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पतीला जिवे ठार मारण्याची धमकी देत घरात घुसून महिलेला कोयता व चाकूचा धाक दाखवत तिच्याकडे चार लाखांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. १६) पंचवटीतील अमृतधाम परिसरातील गणेशनगर येथे उघडकीस आला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात तीन संशयितांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि गायत्री देवरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित बोक्या, अंड्या आणि विज्या (पूर्ण नाव नाही) आणि त्यांच्या साथीदारांनी घराच्या कंपाउंडचे फाटक उघडून आवारात जबरदस्तीने प्रवेश करून घराचा दरवाजावर जोरात ठोसे मारत दरवाजा उघडला. कोयता आणि चाकूचा धाक दाखवत पतीला जिवे मारण्याची धमकी देत चार लाखांच्या खंडणीची मागणी केली. भेदरलेल्या देवरे यांनी नागरिकांना हा प्रकार सांगितला. नागरिकांनी धीर दिल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. घटनेची गंभीर दखल घेत पंचवटी पोलिसांनी संशयितांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, उपनिरीक्षक एस. जी. जगदाळे तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...