आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातपडताळणीअभावी ६० टक्के विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीएचे प्रवेश रखडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- इंजिनिअरिंग, फार्मसी या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी तसेच एमबीए या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी करण्याकरिता फक्त ४ ते ५ दिवसांचीच मुदत बाकी असताना जातपडताळणी प्रमाणपत्राअभावी नाशिकसह राज्यातील मागासवर्ग प्रवर्गातील ६० टक्के विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडली अाहे. प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करतानाच शैक्षणिक कागदपत्रांसमेवत जातपडताळणी प्रमाणपत्रही अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र समितीकडून ती प्रक्रिया पूर्ण हाेत नसल्यामुळे ६० ते ७० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचे फॅसिलिटेशन सेंटरद्वारे रजिस्ट्रेशन व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्णच होत नाही. 


शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी तीन महिन्यांची वाढीव मुदत दिल्याचे जाहीर केले अाहे. मात्र प्रत्यक्षात महाविद्यालयांपर्यंत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. अाॅनलाइन प्रक्रियेतही प्रमाणपत्र अनिवार्यतेबाबत दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे ६० टक्के मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. 

बातम्या आणखी आहेत...