आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थगिती नाहीच, ३१ मेनंतर सिडकाेत अतिक्रमणे काढणार; अायुक्तांचे स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिकेने सुरू केलेल्या सिडकाेतील २४ हजार ५०० घरांवरील अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याचे अामदार सीमा हिरे यांनी जाहीर केले खरे; मात्र त्यास अायुक्त तुकाराम मुंढे यांनी नकार देत असा अादेशच अापल्याला प्राप्त झाला नसल्याचे शुक्रवारी (दि. २५) पत्रकारांशी बाेलताना सांगितले. अामदार हिरे यांना   अादेश प्राप्त झाला असेल तर त्यांनी ताे अापल्यासमाेर ठेवावा, असे अाव्हानदेखील त्यांनी दिले. सिडकाेतील वाढीव बांधकामे नियमित करण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत देण्यात अालेली अाहे. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन माेहीम राबविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सिडकाेतील २४ हजार ५०० घरांचे रेखांकन अाणि माेजणीला सुरुवात केली हाेती. ठिकठिकाणी नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना विराेध केला हाेता. यामुळे जनक्षाेभ वाढल्याने तणावाची स्थिती निर्माण झाल्याने अामदार सीमा हिरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करीत या अायुक्तांच्या अादेशाला स्थगिती अाणल्याचे माध्यमांना कळविले. त्यामुळे सिडकाेवासीयांना माेठा दिलासा मिळाला असतानाच अायुक्तांनी शुक्रवारी पत्रकारांशी बाेलत असा अादेश मुख्यमंत्र्यांनी काढलाच नसल्याचे स्पष्ट केले. 'मी काेणाच्या घरातील बांधकाम पाडत नाही, तर रस्ते अाणि ड्रेनेज वाहिन्यांसाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याचे अादेश दिले अाहेत', असेही त्यांनी सांगितले. 'मुख्यमंत्र्यांनी कारवाईला स्थगिती दिली असती तर तसे अादेश अापल्याला प्राप्त झाले असते. 


अामदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्र्यांचे अादेश अापल्यासमाेर सादर करावे, असेही ते म्हणाले. वाढीव बांधकाम काढण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत देण्यात अाली अाहे. या मुदतीत जे अर्ज करणार नाहीत त्यांची बांधकामे पाडण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


वाढीव बांधकामे नियमित करण्यासाठी कम्पाउंडिंग चार्जेस भरून बांधकामे नियमित करण्याचे अावाहनही करण्यात अाले अाहे. परंतु सिडकाेत एकच एफएसअाय (चटई क्षेत्र)ची मुभा असून येथे टीडीअार (हस्तांतरणीय विकास हक्क) देऊन बांधकामे नियमित करणे शक्य नाही. त्यामुळे ही बांधकामे अधिकृत हाेत नसतानाही पालिकेने केलेले अावाहन चुकीचे असल्याचा दावा करण्यात येत अाहे. शिवाय अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यापूर्वी महापालिकेला सिडकाेची परवानगीही अावश्यक अाहे. 


अादेश नाही तर कारवाई का थांबवली? 
 प्रत्येक अादेश हा लेखी स्वरूपाचाच असावा असे बंधन नसते. मुख्यमंत्र्यांनी स्थगितीचा अादेश ताेंडी दिला अाहे. तसेच, माेबाइलवरही त्यांनी याविषयी अापल्याला माहिती दिली. त्यामुळे अायुक्तांना या संभाषणाचे लेखी अादेश कसे दाखविता येतील अायुक्तांना जर मुख्यमंत्र्यांचे अादेश प्राप्त नसते तर त्यांनी सिडकाेतील कारवाई का थांबवली सातपूर येथील गाळेधारकांवर कारवाई न करण्यासंदर्भात मी जेव्हा अायुक्तांची भेट घेतली हाेती, तेव्हा त्यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करू नये, असे अादेश माेबाइलवरच दिले हाेते. त्यामुळे लेखी अादेशाचा अाग्रह धरणे हेच चुकीचे अाहे. 
- सीमा हिरे, अामदार, पश्चिम मतदारसंघ 

बातम्या आणखी आहेत...