आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारेंच्या समर्थनार्थ नाशिकमध्येही अांदाेलन, २३ मार्चपासून सत्याग्रह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- लोकपाल लोकायुक्त कायदा २०१३ ची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण, निवडणूक सुधारणा अादी मागण्यांसाठी २३ मार्चपासून भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जनक अण्णा हजारे दिल्लीत सत्याग्रह आंदोलन करणार असून, नाशिकमध्येही माहिती अधिकार कार्यकर्ते त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत अण्णांचे अांदोलन दिल्लीत सुरू असेल तोपर्यंत नाशिकमध्येही ते सुरूच ठेवण्याचा निर्धार जिल्हा समितीने केला आहे. 


अांदाेलनाच्या तयारीसाठी शनिवारी हुतात्मा स्मारकात बैठक झाली. त्यामध्ये तरुणांना आंदोलनात सहभागी करून घेण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले. त्यानुसार आंदोलनापूर्वी तीन दिवस महाविद्यालयीन युवकांमध्ये जागृती करण्याचा निर्णय झाला. माहिती अधिकार कार्यकर्ते महाविद्यालयात गांधी टोप्या घालून युवकांना सहभागी होण्यासाठी आवाहन करणार आहे. बैठकीस ज्येष्ठ पत्रकार पां. भा. करंजकर, हेमंत कवडे, संजय करंजकर, दिलीप निकम, राजेंद्र नानकर, बाळासाहेब दौंडे, संतोष बोराडे, निशिकांत पगारे, अॅड. बाळासाहेब गटकळ, अॅड. प्रभाकर वायचळे, स्वप्नील घिया, बापू बैरागी आदींसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उ
 

बातम्या आणखी आहेत...