आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वायू प्रदूषण वाढल्याने नाशकात दाटले धुके; किमान तापमान 11.6 अंशांवर, अाेलावाही वाढला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वातावरणात आलेला कोरडेपणा, जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे जमिनीलगत असलेला गारवा आणि वाढलेल्या प्रदूषणामुळे शहरात बुधवारी सकाळी दाट धुके पसरले हाेते. बुधवारी कमाल १४१ पीपीएम (पार्ट पर मिलीयन) वायू प्रदूषण आणि किमान तापमान ११.६ अंश तर कमाल २८.० अंश सेल्सियस तापमान होते. तसेच ९४ टक्के आर्द्रता असल्याने सकाळी दहा वाजेपर्यंत धुक्याची झालर शहरभर पसरलेली होती. 


मागील आठवड्यापासून शहरातील वातावरणात  कोरडेपणा निर्माण झाला असून  किमान तपमानात घसरण होत आहे. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये ओलावा कायम असल्याने जमिनीलगतच्या थंड हवेमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झाले. त्यामुळे हवेमध्ये पाण्याचे लहान थेंब तयार झाले होते. चारचाकी, दुचाकी, रिक्षा, अवजड वाहणे, कंपन्या यांच्यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे दाट धुके  वारंवार पाहण्यास मिळत आहे. शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच कंपन्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी कोळसा, लाकूड मोठ्या प्रमाणात जाळण्यात येतात. तसेच  इमारतीसह आदी बांधकामे सातत्याने सुरू असल्याने वायू प्रदूषण वाढत आहे.  वाहनामधून  कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोकार्बन्स आणि नायट्रोजन ऑक्साइड  तयार होते. तर बांधकामे, खराब झालेल्या रस्त्यामुळे धूळ उडून(पार्टीक्युलेट मॅटर) प्रदूषण होत आहे.

 

अाराेग्यावर परिणाम

वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होत असूनन श्वसनाच्या प्रक्रियेवर आणि हृदय रक्त यंत्रणेवर परिणाम होतो. वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. श्वसनक्रियेत अडचणी येणे, दमा वाढणे, खोकला येणे यांसारखे प्रकार वाढत असल्याचे डाॅ. किरण कुमावत यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...