आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक-मुंबई हवाई सेवा 22 डिसेंबरपासून; भाग्यवान प्रवाशांना फक्त 1 रुपयात प्रवासाची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी उड्डान योजनेंतर्गत नाशिकहून विमान वाहतूक 22 डिसेंबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे. एअर डेक्कनच्या 19 सीटर विमान  नाशिकहून मुंबईला उड्डान घेईल, अशी माहिती मिळाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

 

भाग्यवान प्रवाशांना फक्त 1 रुपयात प्रवासाची संधी
- काही भाग्यवान प्रवाशांना या विमानाने फक्त एक रुपयात प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
- 40 मिनिटांच्या हवाई प्रवासासाठी 1400 रुपये मोजावे लागणार आहेत.

 

दक्षिण आफ्रिकेतून भाडेतत्वावर आणले 19 सीटर विमान
- एअर डेक्कनने 19 सीटर विमान दक्षिण आफ्रिकेतून भाडेतत्वावर आणले आहे.
- केंद्र सरकारच्या उड्‍डान योजनेत नाशिकचाही समावेश झाला आहे.
- नाशिक आता देशातील सहा प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे.
- नाशिककर लवकरच हवाई प्रवासाचा आनंद अनुभवता येईल.

बातम्या आणखी आहेत...