आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय बाेरस्ते, शशिकांत जाधव व सतीश कुलकर्णी यांना कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिकच्या सर्वांगीण, परिपूर्ण आणि निकोप विकासाला चालना व गती देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या 'नाशिक सिटिझन फोरम' (एनसीएफ) तर्फे सन २०१८ या वर्षासाठी अजय बोरस्ते, शशिकांत जाधव आणि सतीश कुलकर्णी यांना 'कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार' जाहीर करण्यात अाले अाहेत. नाशिक सीटिझन्स फोरमचा १२ वा स्थापना दिन सोहळा २१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता आयटीआय सिग्नलवरील नाईस संकुुल सभागृहात आयोजित करण्यात आला असून, त्यात न्यूज १८-लोकमतचे संपादक डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यावेळी नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अतिरिक्त स्वतंत्र संचालक भास्कर मुंढे यांची विशेष उपस्थिती असेल. 


शहर विकासामध्ये महापालिका प्रमुख भूमिका बजावते आणि तिची सूत्रे नगरसेवकांच्या हाती असतात. म्हणूनच जे नगरसेवक उत्कृष्ट काम करतात त्यांना दाद द्यावी आणि त्यांच्यासारखे काम करण्याची उमेद इतर नगरसेवकांमध्ये जागावी या उद्देशाने नाशिक सीटिझन्स फोरम २०१२ पासून कार्यक्षम नगरसेवकांना पुरस्कार देऊन गौरवित आहे. 


अशी करण्यात अाली निवड 
निवड समितीने पालिकेतील १२२ नगरसेवकांच्या नावाची विविध निकषांवर छाननी व तपासणी केली. या छाननीतून निवडल्या गेलेल्या नगरसेवकांची सविस्तर माहिती घेऊन तिचेही सखोल परीक्षण केले. ही निवड करताना समितीने नगरसेवकांविषयी शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींचा आणि मान्यवरांचाही कल जाणून घेतला. या निवडप्रक्रियेदरम्यान प्रभागातील कामांची पाहणी, पालिकेकडून मिळालेली माहिती, त्या-त्या प्रभागातील नागरिकांची मते यांच्या आधाराने अहवाल तयार केले. त्यावर सामाजिक काम, लोकसंपर्क, प्रभागातील समस्यांची जाण, नागरिकांच्या कामांप्रतिची तत्परता, प्रभागात केलेली कामे, जाहीरनाम्याशी कटिबद्धता, शहरविकासातील योगदान या निकषांवर छाननी समितीने सखोल अभ्यास आणि चर्चा करून मूल्यांकन केले. त्याचप्रमाणे माध्यम प्रतिनिधींच्या मदतीने नगरसेवकांचा सभागृह आणि पालिकेच्या कामकाजातील सहभाग, पालिकेच्या कामकाजाची समज व अधिकारी-कर्मचाऱ्यांशी वागणूक या निकषांवर नगरसेवकांचे मूल्यांकन करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...