आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१० हजार मीटरमध्ये संजीवनीची सुवर्णधाव; रणजित पटेलला राैप्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने गुवाहाटी येथील ५८व्या अांतरराज्य राष्ट्रीय सीनिअर गट अॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत ३३ मिनिट ०९.७८ सेकंद वेळ नाेंदवून सुवर्णपदक पटकावले. 


मात्र ही कामगिरी बजावूनही किमान स्पर्धा किमान पात्रता वेळेत पूर्ण न केल्याने ती एशियन स्पर्धेसाठी पात्र ठरली नाही. त्याबराेबरच नाशिकचा धावपटू रणजित पटेल यानेही दहा हजार पुरुष गटात चमकदार कामगिरी करत २९ मिनिट ३९.७३ सेकंदात पूर्ण करत रजत पटकावले. मात्र एशियन गेम्ससाठी या गटाची पात्रता वेळ पूर्ण शकला नाही. दोनच दिवसांपूर्वी महिला गटात तिने ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत १५ मिनिट २८.७८ सेकंदाची विक्रमी नोंद करत आशियाई स्पर्धेत प्रवेश मिळविला हाेता.

बातम्या आणखी आहेत...