आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१८ बँक ग्राहकांना चार लाख ७२ हजारांचा गंडा, कार्डाच्या नावावर ऑनलाइन फसवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बँकेतून बोलत असल्याचे सांगत बँक ग्राहकांचा एटीएम डेबिट कार्डचा सोळा अंकी नंबर विचारत विविध बँकांच्या १८ खातेदारांना चार लाख ७२ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार अंबडमध्ये उघडकीस आला. सोमवारी (दि. १२) अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

पोलिसांनी दिलेली माहिती व रामब्रिज प्रजापती (रा. संजीवनगर, चुंचाळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जून-२०१७ मध्ये अनोळखी नंबरवरून आलेल्या फोनवरील व्यक्तीने बँकेतून बोलतो असे सांगत एटीएम कार्डची मुदत संपल्याचे सांगत नवीन कार्ड देण्यासाठी एटीएम कार्डचा नंबर मागितला. काही दिवसांनी कॉसमॉस बँकेतील खात्यातून ७० हजार ऑनलाइन काढून घेण्यात आले. याचप्रकारे कृष्णा मोरे यांच्याशी गाबोनप्रो कॉम संकेतस्थळावर संपर्क साधत पेटीएम आमच्या संकेतस्थळावरून घेतल्यास भरघोस सूट देण्याचे अामिष देत ४० हजारांचा ऑनलाइन अपहार करण्यात अाला. तसेच, पूनम शिरसाठ यांचे ४४ हजार, रविराज गंगावणे यांचे ९ हजार ९००, उत्तम कोटकर यांचे ८ हजार २००, मौजीलाल जाधव यांचे ८ हजार २००, शुभदा कुलकर्णी यांचे ५० हजार, गुणवंत मनू यांचे ५ हजार, सोपान साळुंके यांचे २० हजार, मनोज रायसोनी यांचे ४० हजार, गोरक्षनाथ खैरनार यांचे ६ हजार ७००, निरंजन सिंह १४ हजार, मनोज कोठावदे, सुकांत दास, नितीन जाधव, नीलेश काळे या विविध बँकांच्या ग्राहकांना चार लाख ७२ हजार रुपयांना गंडा घातल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या. अंबड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 


फसवणूक झाल्यास पोलिसांना कळवा 
अशाप्रकारे ऑनलाइन फसवणूक झाली असल्यास पोलिसांना कळवा. आणखी काहींची फसवणूक झाली आहे. अपहाराचा आकडा वाढणार आहे. सायबर पोलिसांच्या मदतीने तपास सुरू आहे. - मधुकर कड, वरिष्ठ निरीक्षक, अंबड 

बातम्या आणखी आहेत...