आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक-'बिटकॉइन' व्हर्च्युअल करन्सी देण्याचे अामिष दाखवित संगमनेरच्या दोघांना आयएमपीएसद्वारे अाठ लाख ४० हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस अाला असून यातील मुंबईच्या ठगाला नाशिकमध्ये जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट १ व सायबर पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी (दि. १६) महामार्गावरील एका माेठ्या हाॅटेल पथकाने ही कारवाई केली.
संगमनेर येथील रहिवासी सोपान उंडे यांनी सायबर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याशी काही दिवसांपूर्वी शयित नाजेश इस्मत झवेरी (रा. मीरा-भाइंदररोड, मुंबई) याने इंटरनेटच्या साह्याने संपर्क साधत मीरारोडवरील एका हॉटेलमध्ये बिटकाॅइनद्वारे मल्टि लेव्हल मार्केटिंग पद्धतीने भविष्यात मोठ्या रकमेचा परतावा देण्याचे अामिष दिले.
यानंतर इ-मेलद्वारे संपर्कात राहून संशयिताने उंडे यांच्याशी ओळख वाढवली. वेगवेगळ्या याेजना अाणि जादा पैसा कमविण्याचे अामिष दाखविल्याने त्यावर उंडे यांचा विश्वास बसला. संशयिताने जसे सांगितले, त्याप्रमाणे संगमनेर येथून अॅक्सिस बँकेच्या ऑनलाइन मोबाइल बँकिंगच्या 'आयएमपीए' सुविधेद्वारे संशयिताच्या डीबीएस बँकेतील खात्यात सुरवातीला ५ लाख ४० हजार रुपये ट्रान्सफर केले. तसेच उंडे यांचे नातेवाइक विकास थोरात यांनी तीन लाख रुपये अशाच पद्धतीने संशयिताच्या 'ब्लॉकचेन' या संकेतस्थळावर ट्रान्सफर केले. मोबाइल फाेनवर संपर्क साधून संशयिताने बिटकॉइन ट्रान्सफर झाल्याचे कळवले. मात्र, उंडे यांनी माहिती घेतली असता कुठलीही करन्सी ट्रान्सफर झाली नसल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी तातडीने तपासाची सूत्रे हलविली.
गुगलवर बिटकॉइनची प्रसिद्धी
गुगलवर बिटकॉइन करन्सीची माहिती देण्यात आली आहे. अांतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ही गुंतवणूक पद्धती सध्या चर्चेत आहे. डॉलरप्रमाणेच या करन्सीच्या भावात चढउतार होत असतात. ६० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत एका काॅइनचा भाव असल्याने काळा पैसा मोठ्या प्रमाणात यात गुंतवला जातो. मात्र, भारतात या चलनास रिझर्व्ह बंॅकेची मान्यता नाही. परदेशात त्याचा वापर होत असल्याने परदेशी नागरिकांकडून भारतात त्याची पाळेमुळे रुजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बनावट ग्राहक बनवून रचला सापळा
सहायक अायुक्त नखाते यांनी सायबर शाखेची मदत घेत संशयिताचा ठावठिकाणा शाेधण्यास सुरूवात केली. त्याच्या माेबाईलवर संपर्क साधून त्याच्याकडे ७० लाख रुपये बिटकाॅईनमध्ये गुंतवायचे असल्याचे सांगितले. यासाठी राेख रक्कम देण्याची तयारी दाखवून सांगून काेणत्या ठिकाणी यायचे, असे विचारत ठिकाणही ठरविले. संशयिताने नखाते यांना अगाेदर विक्रमसिंग शहा असे नाव सांगून महामार्गावरील पांडवलेणीजवळच्या एका हाॅटेलमध्ये बाेलावले. त्याप्रमाणे नखाते यांनी अाधीच हाॅटेलच्या परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे प्रत्यक्ष व्यवहार करण्यासाठी दाेघे समाेरासमाेर येताच पाेलिसांनी संशयितास ताब्यात घेतले. त्याची कसून चाैकशी केली असता शहा हे नाव देखील बनावट अाढळून अाले. त्याचे खरे नाव नाजेश इस्मत झवेरी असल्याचे निष्पन्न झाले. या पथकात वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुटे, बी. एच. बोरसे आणि यूनिट १ चे निरीक्षक आनंद वाघ यांनी महत्वाची भूमिका बजावली.
काय आहे बिटकॉइन
ऑनलाइन व्यवहारामध्ये परदेशी नागरिक अवैध व्यवसायात या करन्सीचा वापर करतात. ड्रग्जमाफियांसह परदेशी अवैध व्यावसायिक डॉलर न देता बिटकॉइनचा वापर व्यवहारासाठी करतात. वानक्राय रॅम्सवेअर हा व्हायरस पसरविणाऱ्यांनी बिटकॉइन घेतल्याचे आंतरराष्ट्रीय तपासात उघडकीस अाले आहे.
टोळी कार्यरत : सायबर पोलिसांनी मे २०१७ मध्ये महामार्गावर एका हॉटेलमध्ये छापा टाकत चलन विक्री करणारी राज्यातील पहिली टोळी नाशकताच जेरबंद केली होती. यामध्येही संशयितांनी एमएलएमद्वारे परतावा, कमिशन देण्याचे आमिष दाखविले हाेते. ही टोळी जेरबंद झाल्यानंतर मुंबईची टोळी सक्रिय झाल्याचा संशय आहे.
तक्रारी द्याव्यात
संशयितास अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे कुणाची फसवणूक झाली असल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. शहरातील अाणखी लाेकांची फसवणूक झाल्याचा अंदाज असून फसवणूक झालेल्यांनी पुढे यावे. - अशोक नखाते, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.