आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून ब्लेडने वार; नाशिकमधील घटना, चार अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अकरावीतील मुलीला रस्त्यात अडवून तिच्यासाेबत शिकणाऱ्या मुलाने 'तू माझ्यावर प्रेम का करत नाहीस,' असे म्हणत हातावर ब्लेडने वार केल्याची गंभीर घटना कामटवाडे भागात घडली. मुलासह त्याच्यासाेबतच्या तिघांनी जबरदस्तीने विषारी अाैषध खाऊ घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पीडितेने पाेलिसात केली अाहे. या प्रकाराच्या कसून चाैकशी नंतरही धागेदाेरे हाती लागत नसल्याने पाेलिस चक्रावले अाहेत. पाेलिसांनी चाैघा अल्पवयीनांवर गुन्हा दाखल करीत त्यांचा शाेध सुरू केला अाहे.


तक्रारीत विसंगतीमुळे पाेलिस संभ्रमात 
पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर संशयित मुलांच्या कुटुंबियांची चौकशी केली असता मुख्य संशयित घटनेच्या अाधीच उत्तर प्रदेशात गेल्याचे सांगण्यात अाले. तर दुसरी दोन संशयित मुले बाहेरगावी व अन्य एक कामावर गेलेला हाेता, असेही तपासात पुढे अाले. तक्रारीत दाेन वेगवेगळ्या घटना सांगितल्या जात असल्यामुळे पीडितेच्या तक्रारीत विसंगती दिसत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

 
मुलीने दाेनदा कापली हाेती हाताची नस 
पाेलिसांच्या चाैकशीत, पीडित मुलीने यापूर्वी दोन वेळा स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार पूर्ण झाल्यानंतर तिचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन केले जाणार आहे. यानंतर गुन्ह्याचा सखाेल तपास केला जाणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक तांबे यांनी सांगितले. 


भावनिकदृष्ट्या अप्रगल्भता 
या वयात मुला-मुलींमध्ये भावनिक अप्रगल्भता असते. किशोरवयीनांमध्ये नैसर्गिक नियमानुसार 'हार्मोन्स चेंज' होताे. मात्र बदलत्या टेक्नॉलॉजीने हल्ली यामध्ये बदल होत असल्याने भावनांना आवर घालता येत नाही. त्यामुळे चिडचिड होते. असुरक्षित भावना निर्माण होऊन अशा प्रकारे पाऊल उचलले जाण्याची शक्यता असते. 
- डॉ. हेमंत सोननीस, मानसाेपचारतज्ज्ञ 


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास 
पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मुलीवर उपचार पूर्ण झाल्यावर मानसाेपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन तिचा पुन्हा जबाब घेतला जाईल. त्याचबराेबर सर्व बाजूने गुन्ह्याचा तपास केला जात अाहे. संशयितांना ताब्यात घेऊन कसून चाैकशी केली जाईल. - श्रीकृष्ण कोकाटे, उपआयुक्त परिमंडळ २

बातम्या आणखी आहेत...