आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू, 6 गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बस आणि क्रुझरचा भीषण अपघात होऊन त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे फाट्याजवळ आज सकाळी हा भीषण अपघात झाला. (पाहा अंगाचा थरकाप उडवणारे PHOTOS..)

 

मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील शिरवाडे- वणी फाट्याजवळ भरधाव क्रुझर डिव्हायडरला धडकून शेजारून जाणाऱ्या बसवर आदळली. बस आणि डिव्हायडर यांच्यात क्रुझर फरफटत गेली. बसला जोराचा धक्का बसल्याने बस चालकाने गाडी थांबवली. या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर काही काळासाठी वाहतुकीची कोंडी झाली होती. या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. सर्व जण बागलाण तालुक्यातील किकवारी आणि डांग सौंदाने येथील आहेत

ते लग्न सोहळ्यासाठी जात होती. 

 

मृतांमध्ये आदर्श गाव किकवारीचे प्रणेते केदा काकुलते यांच्या पत्नीचा समावेश आहे. या घटनेने बागलाणमधील किकवारी व डांग सौंदाने येथे शोककळा पसरली आहे.

 

अपघातातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे...
- धनुबाई केदा काकुळते (65, किकवारी)
- रन्ता राजेंद्र गांगुर्डे (45, डांग सौंदाने)
- तेजस्री साहेबराव शिंदे (किकवारी)
- कृष्णाबाई बापु शिंदे (किकवारी)
- अशोक पोपट गांगुर्डे (कळवण)
- सरस्वतीबाई नथु जगताप (किकवारी)

बातम्या आणखी आहेत...