आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन अपघातांत कारचालक, दोन दुचाकीस्वार ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले. नाशिक-पुणेरोडवर कार झाडाला धडकून कारचालक ठार झाला. ओढा येथे दुचाकीला जीपने धडक दिल्याने दुचाकीचालक तर पांडवलेणी जवळ दुचाकी घसरल्याने चालक ठार झाला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक देशपांडे (६५, रा. कॉलेजरोड) शुक्रवारी पहाटे नाशिक-पुणे रोडने स्विफ्ट कारने (एम.एच. १५ सीटी ४४२९) जात असता कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने झाडाला धडक दिली. यात देशपांडे जागीच ठार झाले. औरंगाबादरोडवर काळ्या-पिवळ्या जीपने दुचाकीला (एम. एच. १५ एफसी १७७१) धडक दिल्याने दुचाकीचालक ज्ञानेश्वर लहांगे गंभीर जखमी झाले. त्यांचे बंधू उमेश यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाले. तिसऱ्या अपघातात दत्तात्रेय दुगाराम ओहळे (३२) दुचाकीने (एमएच १५ एमबी ६५०२) पांडवलेणीकडून विल्होळीकडे जाताना दुचाकी घसरून पडले. डोक्यास गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. याप्रकरणी मुंबईनाका, आडगाव, इंदिरानगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...