आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह ठरलेला नसतानाही वाटल्या पत्रिका; विकृत तरूणीचे कृत्य, तरुणीची पाेलिसांत तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा- विवाह ठरलेला नसतानाही एका विकृत युवकाने नात्यातीलच एका मुलीला नवरी बनवत थेट विवाहाची पत्रिका छापून नातेवाइकांसह मित्रपरिवाराला त्या वाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने बागलाण व देवळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलीला व तिच्या कुटुंबीयांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी सटाणा पोलिसांत धाव घेत कोणताही संबंध नसताना मेशी (ता. देवळा) येथील प्रवीण दादाजी मोरे याने परस्पर विवाहपत्रिका छापून वाटल्यामुळे माझी बदनामी झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. 


सटाणा पोलिसांकडे आलेल्या तक्रार अर्जानुसार, प्रवीण दादाजी मोरे या युवकाने नात्यातील एका युवतीशी १८ मे २०१८ रोजी ब्राह्मणगाव (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेत दुपारी १२.३५ वाजता विवाह असल्याच्या पत्रिका नातेवाइक व मित्रपरिवाराला वाटल्या. मात्र, पत्रिकेत सविस्तर उल्लेख असलेल्या नवरीच्या परिवाराला जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सटाणा पोलिस ठाणे गाठून कोणतीही बोलणी झालेली नसताना व आम्हाला काहीही कल्पना नसताना परस्पर माझ्या नावाचा उल्लेख नवरी म्हणून करत माझी बदनामी केल्याची तक्रार पीडित मुलीने केली अाहे. तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नातेवाइकांना विचारात न घेता संपूर्ण कुटुंबाची बदनामी झाली, काहीएक संबंध नसताना माझे नाव नवरी म्हणून वापरत पत्रिका वाटल्याने तोतया नवरदेव प्रवीण दादाजी मोरे, सुनीता दादाजी मोरे व त्यांना सहकार्य करणारा दिलीप देवराम शिरसाठ यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे. पीडित तरुणी उच्चशिक्षित आहे. याबाबत सटाणा पोलिसांनी तोतया नवरदेव प्रवीण मोरे याला ताब्यात घेतले. ताे बारावीपर्यंत शिकलेला असून दाेन वर्षे नाशिकमध्ये कंपनीत नाेकरीस हाेता. नंतर त्याने शेती सुरू केली. 


मामाच्या लग्नाला यायचं हं.... 
विवाह जमलेला नसतानाही प्रवीण मोरे याने छापलेली पत्रिका अचंबित करणारी आहे. यात पुण्यस्मरण, नमन, प्रेषक, संयोजक, कार्यवाहक, व्यवस्थापक, सहकार्य, निमंत्रक अशा मथळ्याखाली नातेवाइकांची नावे टाकली अाहे. 'आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हं' म्हणून कुटुंबातील लहान मुलांचीही नावे टाकली अाहे. अापली उपस्थिती प्रार्थनीय असल्याचे पत्रिकेत म्हटले आहे. समाजातील विकृती कोणत्याही थराला जाऊ शकते हे या घटनेवरून अधोरेखित होते.

बातम्या आणखी आहेत...