आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा कोटींना गंडा; मिरजकर सराफ, त्रिशा जेम्सच्या ११ संचालकांवर गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सोने तारण व रोख रक्कम गुंतवल्यास त्यावर दरमहा एक ते दीड टक्का व्याज देण्याचे अामिष दाखवून जुने नाशिकमधील बुधवार पेठेतील मिरजकर सराफ व गंगापूरराेडवरील त्रिशा जेम्स कंपनीच्या संचालकांनी सामान्य गुंतवणूकदारांना सव्वा कोटींना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. याप्रकरणी मिरजकर ज्वेलर्स, त्रिशा व जेम्स कंपनीचे संचालक महेश मिरजकर, हर्षल नाईक यांच्यासह अकरा संचालकांविरुद्ध सरकारवाडा पाेलिसात फसवणूक अाणि महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 


पोलिसांनी दिलेली माहिती व पल्लवी उगावकर यांच्या तक्रारीनुसार, मिरजकर सराफचे संचालक हर्षल नाईक व महेश मिरजकर यांनी एप्रिल २०१५ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत विविध योजनांचे अामिष दाखवत प्रलोभन दाखवले. सोने अथवा रोकड तारण ठेवल्यास दरमहा दीड टक्का व्याज देण्याचे अामिष दाखवत ग्राहकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तक्रारदार अाणि संशयित मिरजकर यांचा परिचय असल्याने त्यांच्या कुटुंबीयांतील सेवानिवृत्त वडील, भाऊ यांनाही जादा व्याज देण्याचे अामिष दाखवत वेगवेगळ्या रकमा गुंतवण्यास भाग पाडले. या गुंतवणुकीच्या माेबदल्यात निश्चित व्याजाने पैसे परतीची कागदपत्रे बनवून दिली हाेती. उगावकर व त्यांच्या नातलगांकडून एक कोटी २० लाखांच्या ठेवी जमा केल्या. मात्र, ठरलेल्या कराराप्रमाणे व्याज दिले नाही. रोख स्वरूपात घेतलेल्या ठेवी परत केल्या नाही. मात्र, साेने तारण व गुंतवणुकीची मुदत संपूनही मुद्दलसह पैशांची मागणी केली असता संशयित मिरजकर सराफ यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदारांनी भेटून व माेबाइलवर संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात अाली. 


संशयितांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव 
शुक्रवारी (दि. २०) सरकारवाडा पाेलिस ठाण्यात अकरा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल हाेताच त्यांना अटकेची शक्यता वर्तवली जात अाहे. मात्र, प्रत्यक्षात संशयितांनी शुक्रवारी दुपारीच जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जासाठी धाव घेतली हाेती. यासंदर्भात, तक्रारदाराने वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनासही ही बाब अाणून दिली असता त्यांनी त्याकडे कानाडाेळा केल्याने पाेलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात अाहे. सव्वा काेटीच्या फसवणुकीचा प्रकार असतानाही पाेलिस गांभीर्याने घेत नसल्याने संताप व्यक्त हाेत अाहे. 


फसवणुकीचा अाकडा वाढण्याची शक्यता 
सरकारवाडा पाेलिस ठाण्यात पहिल्या तक्रारीनुसार, मिरजकर सराफ अाणि त्रिशा जेम्स कंपनीच्या संचालकांविरुद्ध एक काेटी २० लाखांना गंडा घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला असला तरी या गुन्ह्याची व्याप्ती बघता गुंतवणूकदारांची संख्या वाढून या फसवणुकीचा अाकडा माेठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तवली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...