आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 मे राेजी इंजिनिअरिंग, कृषी, फार्मसीसाठी सीईटी; नाशिकमध्ये 60 तर विभागात 144 परीक्षा केंद्रे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- इंजिनिअरिंग, फार्मसीसह कृषी शिक्षणक्रमाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी येत्या १० मे रोजी एमएचटी सीईटी ही प्रवेश परीक्षा होणार आहे. सीईटी यंदा राज्यभरातून तब्बल चार लाख ३५ हजार ६०७ परीक्षार्थी असून नाशिकमध्ये ५१ हजार विद्यार्थी आहे. नाशिकमधील ६० तर विभागातील १४४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होईल. डीटीईच्या संकेतस्थळावर हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी लॉगीन आयडी व पासवर्डचा वापर करून १० मेपूर्वी हॉलतिकीट डाउनलोड करून घेण्याचे आवाहन डीटीईतर्फे करण्यात आले आहे. ३ जून रोजी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर होईल. 


व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश परीक्षा अनिवार्य असते. सीईटी न दिलेल्या विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरत नाही. राज्यभरातील शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित संस्थांमधील प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेद्वारे प्रवेश दिले जातात. सीईटी परीक्षेसाठी यंदा राज्यभरातून सुमारे चार लाख ३५ हजारांहून अधिक परीक्षार्थी आहेत. येत्या १० मे रोजी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. तर ३ जून रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर होईल. सीईटीसाठी तीन प्रश्नपत्रिका असतील. त्यात भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांची प्रत्येकी ५० गुण असलेली सामायिक प्रश्नपत्रिका असेल, तर गणितासाठी १०० गुण आणि जीवशास्त्र १०० गुण असलेल्या स्वतंत्र प्रश्नपत्रिका असणार आहेत. अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित २०-८० टक्के याप्रमाणे ही परीक्षा होईल. डीटीईच्या संकेतस्थळावरुन हॉलतिकीट डाउनलोड करून घ्यावे. 


विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा केंद्रावर हजर रहावे 
विद्यार्थ्यांनी सर्व माहिती, परीक्षा केंद्र याबाबतची माहिती जाणून घेऊन परीक्षेला निर्धारित वेळेच्या पूर्वीच केंद्रावर हजर राहावे. जेणेकरून परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही. 
- प्रा. ज्ञानदेव नाठे, सहसंचालक, डीटीई, नाशिक 

बातम्या आणखी आहेत...