आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोतील अतिक्रमण निर्मूलन कारवाईला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- महापालिकेने सुरू केलेल्या सिडकाेतील २४ हजार ५०० घरांवरील अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली अाहे. या कारवाईमुळे सिडकाेवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने अामदार सीमा हिरे यांनी कारवाईला स्थगिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश अाल्याने सिडकाेवासीयांना दिलासा मिळाला अाहे. 


महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने   सिडकाेतील २४ हजार ५०० घरांचे रेखांकन आणि मोजणीला सुरुवात केली हाेती. ठिकठिकाणी नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना विरोध केला होता. यामुळे जनक्षोभ वाढल्याने तणावाची स्थिती निर्माण झाल्याने आमदार सीमा हिरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. पालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांच्या अतिक्रमण निर्मूलनाच्या अादेशाविराेधात सिडकोतील नागरिकांसह आमदार, नगरसेवक आक्रमक झाले होते. आंदोलनाची तयारी सुरू झाली होती. हजारो घरांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे सांगून तीन दिवसांपासून पालिकेकडून रेखांकन सुरू करण्यातअाले हाेते. त्यामुळे सिडकाेवासीय धास्तावले होते. 

 

आमदार सीमा हिरे यांनी उत्तमनगरमधील ब्रम्हपुरी चौक, रायगड चौक, तानाजी चौक या ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेत त्यांची कैफियत ऐकून घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून सिडकोच्या सदनिकांवरील अतिक्रमणाची कारवाई थांबविण्याबाबत चर्चा केली असता फडणवीस यांनी सिडकाेतील अतिक्रमण निर्मूलन कारवाईला स्थगिती देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बुधवारी सिडकोतील नागरिक व नगरसेवकांनी बुधवारी पालिकेवर धडक देत पालिका आयुक्तांची भेट घेत कारवाईबाबत विचारणा केली. यावेळी आयुक्त आणि नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अतिक्रमणांच्या कारवाईपूर्वी नोटिसा का दिल्या नाहीत, असा प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना आयुक्तांनी फटकारल्याने नागरिक अधिकच संतप्त झाले होते. त्यांनी न्यायालयीन लढाईसोबच आंदोलनाचीही तयारी सुरु होती. सिडकोतील कामगारवर्ग अस्वस्थ झाला होता. मात्र थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्थगिती आणल्याने सर्वानीच सुटकेचा निश्वास टाकला आहे.


मुख्यमंत्र्यांनीच स्थगिती दिल्याने समाधान 
आयुक्तांना विनंती करूनही ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. मात्र जनहित विचारात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईला स्थगिती दिल्याने अाम्ही समाधानी अाहाेत. 
- सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम 


टीडीआर अशक्यच 
राज्य सरकारने जाहीर केलेल्या धोरणांतर्गत महापालिकेने सिडकाेतील नागरिकांना अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी कम्पाउंडिंग चार्जेस भरून बांधकामे नियमित करण्याचे आवाहन केले आहे. परंतु, महापालिकेची ही फसवेगिरी असल्याचा दावा येथील नगरसेवकांनी केला आहे. सिडकोत एकच एफएसआय (चटई क्षेत्र) ची मुभा असून येथे टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) देऊन बांधकामे नियमित करणे शक्य नाही. त्यामुळे ही बांधकामे अधिकृत होत नसतानाही पालिकेने केलेले आवाहन चुकीचे असल्याचा दावा केला जात आहे. तसेच अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यापूर्वी महापालिकेला सिडकोची परवानगीही आवश्यक आहे. त्यामुळे पालिकेला याबाबत तडकाफडकी निर्णय घेता येणार नाही, हे स्पष्ट झाले अाहे 

बातम्या आणखी आहेत...