आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिर्यादीची मूळ तक्रारच गायबप्रकरणी गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग खात्यातील कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर लाच प्रकरणात फिर्यादीची मूळ तक्रारच गायब झाल्याप्रकरणी अखेर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा सरकारी वकील अजय मिसर खटल्याच्या कागदपत्रांची तपासणी करत असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 


जिल्हा सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार चिखलीकर यांना २२ हजारांची लाच घेताना एसीबीने अटक केली होती. हा खटला जिल्हा न्यायाधीश एस. टी. पांडे यांच्या न्यायालयात सुरू आहे. तक्रारदार इरफान शेख यांनी दिलेल्या तक्रारीवर दोन पंचांची सही असून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल आहे. २० डिसेंबर २०१७ ला इरफान शेख याचा पुरावा नोंदवला गेला. मूळ तक्रार दाखवल्यानंतर मजकूर बरोबर असल्याचे शेख यांनी सांगितले होते. चिखलीकर यांच्या वकिलांनी इरफानच्या उलटतपासणीमध्ये तक्रारदाराला प्रत दाखवली नाही. 


दोषींवर कारवाई गरजेची 
न्यायालयाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार गंभीर बाब आहे. सर्वसामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवर विश्वास कायम आहे. अशाप्रकारे कागदपत्र गहाळ करणाऱ्यास ७ वर्षाची शिक्षा आहे. दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. 
- अॅड. अजय मिसर, जिल्हा सरकारी वकील 

बातम्या आणखी आहेत...