आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादा व्याजाच्या अामिषाने हजारो गुंतवणूकदारांना 80 लाखांवर गंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव- मुंबई येथील सिट्रस चेक इन्स लिमिटेड कंपनीने जादा व्याजाचे अामिष दाखवून हजारो ग्राहकांचे गुंतवणूक केलेले पैसे मुदत संपूनही परत केले नसल्याने कंपनीमालक ओमप्रकाश गोयंकासह संचालक व एजंटविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणुकीचा आकडा सध्या ८० लाख दिसत असला, तरी हा आकडा करोडोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. एकट्या लासलगाव परिसरात साठ ते सत्तर कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

 
गेल्या १७ ते १८ वर्षांपूर्वीपासून ही कंपनी व्यवहार करत असून २०१२ पासून अडचणीत होती. कंपनीच्या एजंटांची संख्या लासलगाव परिसरातच शंभरावर आहे. या परिसरातच मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार असल्याने येथील फसवणुकीचा आकडा सुमारे ६० ते ७० कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...