आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीमध्ये कमी गुण मिळाल्याने नाशकात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दहावीमध्ये कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (दि. ८) फुलेनगर येथे दुपारी २.३० वाजता हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला. पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षी एकनाथ बेंडकुळे (१६) ही श्रीराम विद्यालयात शिक्षण घेत होती. दहावीत तिला ५६ टक्के गुण मिळाले. मात्र, ८० टक्के गुण मिळण्याची तिला अपेक्षा हाेती. कमी गुण मिळाल्याने ती हताश झाली हाेती. दुपारी घरात कोणी नसताना तिने गळफास घेत आत्महत्या केली. साक्षीचे वडील मार्केट यार्डमध्ये तर आई कंपनीमध्ये काम करते. तिच्या पश्चात लहान भाऊ आहे. दहावीमध्ये ५६ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण होऊनही साक्षीने अात्महत्येचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत हाेती. याप्रकरणी हवालदार आर. आर. साळवे तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...