आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालेगाव बॉम्बस्फोटाची गुप्त माहिती यूपीए सरकारनेच दडवली, पुरोहितांचा गौप्यस्फोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य संंशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंहच्या अटकेनंतर सदर्न कमांडद्वारे आपण सरकारला संघाच्या सहभागाची माहिती दिली. मात्र तत्कालीन यूपीए सरकारने आपल्याला जाणीवपूर्वक अडकवल्याचे दुसरे संशयित आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांचे म्हणणे सध्या माध्यमांच्या चर्चेत आले आहे.

 

‘दिव्य मराठी’ने मात्र ८ महिन्यांपूर्वीच ही बाब प्रकाशात आणली होती. २९ सप्टेंबरला मालेगाव स्फोट झाला. १२ ऑक्टोबरला त्याच्या संशयाची सुई संघाकडे जात असल्याची माहिती आपण लष्कराद्वारे तत्कालीन सरकारला दिल्याचा बचाव पुरोहित यांनी केल्याचे २७ सप्टेंबर २०१७ रोजी ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले. दरम्यान, पुरोहित यांच्यावरील बेकायदा कारवायांचे कलम सिद्ध होईपर्यंत त्यांच्या खटल्याच्या युक्तिवादास सुरुवात करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला दिल्याने कर्नल पुरोहितांना दिलासा मिळाला आहे.


२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावात शब्बे बारातच्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचे बळी गेले हाेते. त्या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहसह लष्करी सेवेतील कर्नल प्रसाद पुरोहित, लष्कराचा खबरी सुधाकर चतुर्वेदी आणि निवृत्ती मेजर रमेश उपाध्याय यांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने अटक केली. दरम्यान, लष्कराच्या गुप्तहेर खात्याचे काम करीत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ अधिकारी इंद्रेशकुमार महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही विध्वंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती आपण सदर्न कमांडचे मेजर भगीरथ यांना १५ ऑक्टोबर रोजी दिल्याचा पुरोहित यांचा बचाव आहे.
 

पुरोहित यांच्यावरील बेकायदा कारवायांचे कलम सिद्ध होईपर्यंत त्यांच्या खटल्याच्या युक्तिवादास सुरुवात करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला दिल्याने कर्नल पुरोहितांना दिलासा मिळाला आहे.


२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावात शब्बे बारातच्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचे बळी गेले हाेते. त्या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहसह लष्करी सेवेतील कर्नल प्रसाद पुरोहित, लष्कराचा खबरी सुधाकर चतुर्वेदी आणि निवृत्ती मेजर रमेश उपाध्येय यांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने अटक केली.

 

दरम्यान, लष्कराच्या गुप्तहेर खात्याचे काम करीत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ अधिकारी इंद्रेशकुमार महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही विध्वंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती आपण सदर्न कमांडचे मेजर भागिरथ यांना १५ ऑक्टोबर रोजी दिल्याचा पुरोहित यांचा बचाव आहे.  १५ ऑक्टोबरच्या त्यांच्या पत्राचा दाखला देऊन त्यांचा हा बचाव ‘दिव्य मराठी’ने २७ सप्टेंबर रोजी उघड केला होता. त्या पत्रात ते म्हणातात, ‘आरएसएसचे हिमाचल प्रदेशाचे प्रमुख इंद्रेशकुमार यांनी ऑक्टोबर २००७ दरम्यान काश्मीर, जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, नेपाळ, सिक्कीम आणि भूतानमध्ये आपले नेटवर्क उभे केल्याचे तसेच आरएसएसचे नेपाळमधील सदस्य सुभेदार सिंग आणि इंद्रेशकुमार नेपाळमधील एजंटांच्या संपर्कात आहेत. इंद्रेशकुमार यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आजी माजी सदस्यांवर प्रभाव निर्माण केला आहे. नवी दिल्ली येथील अलोक नामक गृहस्थ त्यांचा उजवा हात आहेत. मध्यप्रदेश, इंदूर, देवास आणि जबलपूरमधील दोन सहकार्यांच्या मार्फत इंद्रेशकुमार मालेगाव आणि गुजरातमध्ये धार्मिक संघर्ष वाढविणाऱ्या कारवाया करू शकतात.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, दिव्‍य मराठीने 8 म‍हिन्‍यांपूर्वीच ही बाब प्रकाशात आणली होती...

बातम्या आणखी आहेत...