आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अार्थिक अामिष दाखवून कंपन्यांची फसवणूक सुरूच; 1 कंपनी देतेय 10 दिवसांत दामदुप्पट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-  जादा पैशांचे अामिष दाखवून विविध कंपन्यांनी हजाराे गुंतवणूकदारांची फसवणूक केली अाहे. एकट्या नाशिक शहरात मैत्रेय, फडणीस, केबीसी, पर्ल्स, ट्रू लाइफ, इमू, एचबीएन यांसारख्या अनेक कंपन्यांनी कराेडाे रुपयांची फसवणूक करून गाशा गुंडाळला अाहे. पाेलिस यंत्रणेकडून हाेणाऱ्या संथगतीच्या तपासामुळे व कायद्यातील पळवाटांमुळे त्यांच्यावर कठाेर कारवाई हाेत नसल्याने नेहमीच नवनवीन कंपन्या उदयास येत अाहे. अशाच एका नवीन कंपनीकडून २४ तासांत पैशांवर व्याज दिले जात अाहे. अर्थातच अवघ्या १० दिवसांत दामदुप्पटची अाॅनलाइन याेजना सुरू करण्यात अाली अाहे. या याेजनेत पैसे गुंतविण्यासाठी वेटिंग सुरू अाहे.

 

प्रलाेभने दाखवून फसवणूक करणाऱ्या प्रकारावर डी. बी. स्टारचा हा प्रकाशझाेत... दामदुप्पट पैशाचे अामिष दाखवून गुंतवणूकदारांची काेट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत असतानाही वेगळी याेजना घेऊन काही कंपन्या पुन्हा मार्केटमध्ये पाय राेवू लागल्या अाहेत. एजंटला हाताशी धरून नागरिकांना जादा माेबदल्याचे अामिष दिले जात अाहे. विशेष म्हणजे काही कंपन्यांकडून वेबसाइट तयार करण्यात अालेल्या अाहे. या वेबसाइटवर पैशांचा माेबदला कसा मिळणार याचा तक्ताच प्रसिद्ध करण्यात अाला अाहे. त्यामुळे या याेजनेकडे माेठ्या प्रमाणात गुंतवणूकदार अाकर्षित हाेत अाहे.

 

एमएलएम सिस्टिमचा केला जाताे वापर
नागरिकांना अाकर्षित करण्यासाठी मल्टि लेव्हल मार्केटिंगचा वापर केला जाताे. या सिस्टिममधून संबंधित एजंट सुरुवातीस जवळच्या नातलगांना व त्यानंतर मित्रांना याेजना समजावून सांगतानाच 'माझ्या खात्यावर पैसे जमा झाले अाहेत' असे सांगत बँक पासबूकची नाेंद दाखवताे. त्यामुळे नातलग व मित्रांचा विश्वास बसताे. त्यामुळे ते स्वत:ही गुंतवणूक करतात अाणि इतरांनाही गुंतवणूक करण्यास प्राेत्साहित करतात. याचा फायदा संबंधित कंपनीला हाेताे.

 

केबीसीकडून ८००० जणांची फसवणूक
केबीसी मल्टिट्रेड नावाची कंपनी काढून नाशिकच्या भाऊसाहेब चव्हाणने गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवले होते. कंपनीने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ७०० एजंट ठेवी गोळा करण्यासाठी नेमले होते. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी, कष्टकऱ्यांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. केबीसीत तब्बल आठ हजार गुंतवणूकदारांचे २१० कोटी रुपये अडकले हाेते. अजूनही हे प्रकरण प्रलंबित अाहे.

 

ट्रू लाइफने गंडवले ६००० जणांना
मालेगाव येथील दीपक जिभाऊ सूर्यवंशी याने १५ मे २०१५ ला ट्रू लाइफ कंपनी स्थापन केली हाेती. कंपनीचे चार उत्पादने असल्याचे सांगत त्याने साडेतीन हजार रुपये भरून अंगठी खरेदी करण्याचे, तसेच ५ हजार १५० रुपये भरून सफारी व पैठणीचे आमिष गुंतवणूकदारांना दिले हाेते. यातील किमान एका पॅकेजमध्ये गुंतवणूक केल्यासच साखळी पद्धतीने सभासद करण्यास गुंतवणूकदार पात्र राहील अशी व्यवस्था त्याने करून ठेवली हाेती. दोन सभासद तयार केल्यास एक हजार रुपये मिळतील. महिन्याकाठी दीड लाख कमावण्याची संधी असल्याचे आमिषही त्याने योजनेद्वारे अनेकांना दाखवले. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांत कंपनीने वर्षभरात साडेसहा हजारांपेक्षा जास्त सभासद जोडले. यातून सुमारे तीन कोटींची माया दीपक सूर्यवंशीने गोळा केली.

 

पर्ल्सचा साडेपाच काेटी लाेकांना गंडा
पर्ल्स समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या निर्मलसिंग भांगू यांनी पर्ल्स अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड आणि पर्ल्स गोल्डन फाॅरेस्ट लिमिटेड या कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून तब्बल ४५ हजार कोटी रुपये गोळा केले होते. भांगूंच्या कंपनीत साडेपाच कोटी गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते. एवढ्या माेठ्या संख्येन फसवणूक हाेऊनही अद्यापही अनेकांना अापण भरलेले पैसेही मिळालेले नाहीत. तर दुप्पट वा व्याज दूरच. अजूनही लाेक यासाठी लढत अाहेत.

 

फक्त ३० गुन्ह्यांचा तपास सुरू
एकट्या नाशिक शहरात ४० हून अधिक कंपन्यांकडून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात अाली अाहे. त्यापैकी अार्थिक गुन्हे शाखेकडे सद्यस्थितीत ३० गुन्ह्यांचा तपास सुरू अाहे. यात केबीसी, फडणीस, एचबीएन यांसारख्या कंपन्यांचा समावेश अाहे. फसवणूक करणाऱ्यांपैकी काही कंपन्यांचा तपास सीअायडीकडे तर काही कंपन्यांचा तपास पाेलिस ठाण्यामार्फतच सुरू अाहे.

बातम्या आणखी आहेत...