आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम कचरा नाल्यामध्ये टाकल्याने दहा हजारांचा दंड, सिडकाेत नागरिकांनी पकडले वाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - प्रभाग २८ मधील रामेश्वरनगर भागात पावसाळी नाल्यात मोठ्या प्रमाणात ताेडलेले बांधकाम साहित्य टाकणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाचे वाहन जागरूक नागरिकांनी पकडले. महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत जागेवरच त्याला दहा हजार रुपयांचा दंड आकारला. त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

अंबड एमआयडीसी, उपेंद्रनगर, डीजीपीनगर अशा महत्त्वाच्या भागातील पावसाळी पाणी या नाल्यातून वाहते. हा नाला बुजल्यास किंवा यात कचरा टाकल्यास वाहणाऱ्या पाण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यास पाणी नाल्यातून न वाहता रस्त्यावर येऊन दुर्घटना होतात. हे सर्व टाळण्यासाठी पावसाळी नाले स्वच्छ ठेवणे गरजेचे असताना एक बांधकाम व्यावसायिक रॉ मटेरियल व कचरा नाल्यात टाकत हाेता. या भागातील जागरूक नागरिक आबा महाजन, बाळा पुरकर, राकेश गरुड, मुन्ना मिश्रा, भूषण भामरे, सोनू तुपे, बाळासाहेब पवार, ललित मोरे, भूषण भामरे, देविदास शेवाळे, दिनेश सोनवणे आदींसह महिला व नागरिकांनी कचरा टाकणारे चारचाकी वाहन (एमएच १५ इजी ९०३३) थांबवून ठेवले. काही नागरिकांनी याबाबत महापालिकेला कळविताच घटनास्थळी दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिक अाणि वाहनचालकाला दहा हजारांचा दंड ठाेठावला.

 

सिडकाेत आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
सिडकोतील बहुतेक पावसाळी नाले स्वच्छ न झाल्याने ठिकठिकाणी नाल्यात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच अशा प्रकारे बेजबाबदारपणे बांधकाम कचरा टाकलाग जात असेल तर त्याची गांभीर्याने दखल घेण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 

कसे हाेईल शहर स्वच्छ-सुंदर...
'स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक'ची संकल्पना राबविली जात असताना शहरातील काही नामांकित बांधकाम व्यावसायिक पावसाळी नाल्यात बांधकाम साहित्य अाणून टाकतात. महापालिकेने यावर कडक कारवाई करावी.
- आबा महाजन, सामाजिक कार्यकर्ते

बातम्या आणखी आहेत...