आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक अामदार मतदारसंघासाठी अाज मतमोजणी; प्रशासन सज्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी अंबड येथील सेंटर वेअर हाउस येथे होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असून यासाठी २० टेबलची मांडणी करण्यात आली आहे. हक्काचा आमदार म्हणून शिक्षकांची कोणाला पसंती मिळते याकडे नाशिक विभागाचे लक्ष लागले अाहे. शिक्षक मतदार संघासाठी राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने पैशांच्या आमिषापासून पैठणी वाटपापर्यंत, आरोप-प्रत्याराेपासून थेट हाणामारीपर्यंत गेलेली शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २५ जून रोजी पार पडली. विशेष म्हणजे ९२ टक्के शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने निवडणुकीची गणिते नक्कीच बदलणार आहे. शिक्षक आपला प्रामाणिकपणा जपत शिक्षकांमधीलच आमदार निवडून देतात की पैशांच्या लोभाला बळी पडतात हे मतमोजणीतून समजणार आहे. 


यंदा मतदानानंतरही शिक्षक आमदार कोण होते यावर चौकाचौकामध्ये चर्चा रंगली होती. चर्चेमध्ये संदीप बेडसे, किशोर दराडे, भाऊसाहेब कचरे यांचे नाव आघाडीने घेतले जात होते. जळगाव, नंदुरबार या पट्ट्यातून अनिकेत पाटील आणि शालिग्राम भिरुड यांच्या नावाची चर्चा रंगली होती. परंतु विद्यार्थ्यांना नैतिकेचे शिक्षण देणारे शिक्षक कोणाच्या पारड्यात मताचे दान करतात हे गुरुवारी उशिरापर्यंत समजणार आहे. 


अशी आहे मतमोजणी प्रक्रिया 
 शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ९४ मतदार केंद्रातून एकूण ४९ हजार ७४२ मतदान झाले आहे. मतमोजणीसाठी २० टेबल लावलेले आहे. पहिल्या पाच राउंडसाठी प्रत्येक टेबलला प्रत्येकी पाच पेट्या दिल्या जाणार आहे. यामध्ये पाचव्या राऊंडला शेवटच्या ६ टेबलला पेट्या शिल्लक राहणार नाही. एकूण मतपत्रिकेच्या हिशेबानुसार ५० चे गठ्ठे तयार करण्यात येणार अाहेत. ते सर्व गठ्ठे एकत्रित केले जाणार असून कोणत्या केंद्राची मतपत्रिका आहे हे उमेदवारांना समजणार नाही. पहिल्या आणि दुसऱ्या राउंडला प्रत्येक टेबलला १ हजार मतपत्रिका देण्यात येणार आहे. तिसऱ्या राउंडला ५०० मतपत्रिका दिल्या जातील. म्हणजे पहिल्या राउंडला २० हजार, दुसऱ्या राउंड २० हजार तर तिसऱ्या राउंडला १० हजार मतपत्रिका देण्यात येतील. त्यानंतर बाद आणि नोटा मतपत्रिकांची संख्या एकूण मतपत्रिकेतून वजा करून उरलेल्या वैध मतपत्रिकेच्या संख्येनुसार त्याचा कोटा ठरविला जाईल. या कोट्याच्या पन्नास टक्क्यांपैकी ज्या उमेदवाराला अधिक मतदान असेल तो विजयी हाेणार अाहे. मात्र, एकाही उमेदवाराने कोटा पूर्ण केला नाही, तर शेवटच्या उमेदवाराला बाद करून त्याच्या पत्रिकेतील दोन नंबरची मते ज्या उमेदवाराला असतील ती मते आघाडीच्या उमेदवारामध्ये मोजली जातील. 


१६ व्या नंबरचा उमेदवार बाद होऊनही कोटा पूर्ण झाला नाही तर १५ नंबरच्या उमेदवाराला बाद करण्यात येऊन त्याच्यातील दोन नंबरची मते मोजली जातील. या प्रकारे कोटा पूर्ण होईपर्यंत म्हणजे शेवटचे दोन आघाडीचे उमेदवार राहतील तोपर्यंत ही प्रक्रिया चालेल. शेवटचे दोन उमेदवार राहतील यामध्ये ज्या उमेदवाराला जास्त मते असतील, तो उमेदवार विजयी घोषित करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...