आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँगस्टर सुका पाचासह अाठ जणांवर माेक्कांतर्गत अाराेपपत्र दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- मुंबई-अाग्रा महामार्गावरील चांदवड टाेलनाक्यावर पाच महिन्यांपूर्वी सापडलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी पाेलिसांनी गँगस्टर सुका पाचासह अाठ जणांविराेधात साेमवारी नाशिकच्या विशेष माेक्का न्यायालयात अाराेपपत्र दाखल केले. यातील एक संशयित अल्पवयीन असल्याने त्याचे स्वतंत्र अाराेपपत्र विधी संघर्ष न्यायालयात सादर करण्यात अाले. न्यायालयाने वाढवून दिलेल्या तीन महिन्यांच्या मुदतीत पाेलिसांनी सूक्ष्म तपास करून सबळ पुरावे जमा करत चार हजार पानांचे अाराेपपत्र तयार केले अाहे. 


मुंबईच्या शिवडी भागातील गुंड साहिल खान अकबर बादशाह ऊर्फ सुका पाचा याने उत्तर प्रदेशातील बांदा येथील 'निझाम मेसर्स' हे दुकान फाेडून माेठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा लुटला हाेता. हा शस्त्रसाठा बाेलेराे जीपने मुंबईकडे नेत असताना पाेलिसांनी त्याला चांदवड टाेलनाक्यावर १४ डिसेंबर २०१७ ला जेरबंद केले हाेते. जीपच्या वरील भागात कप्पा तयार करून त्यात २५ रायफली, २ विदेशी पिस्तूल, १७ रिव्हाॅल्व्हर व ४ हजार १४० जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा दडवून ठेवण्यात अाला हाेता. पाेलिसांनी सुका पाचासह सलमान अमानुल्ला खान व नागेश बनसाेडे या तिघांना अटक केली हाेती. तपासात करीम शेख, अमीर रफीक शेख ऊर्फ अमीर लंगडा, वाजिद अली फैजअली शहा, संजय सूर्यकांत साळुंके, माेहम्मद सलमान अन्वर कुरेशी व एका अल्पवयीन तरुणाचा सहभाग निष्पन्न झाल्याने या सर्वांना अटक करण्यात अाली हाेती. या टाेळीचा म्हाेरक्या सुका पाचावर गंभीर स्वरूपाचे २२ गुन्हे दाखल अाहेत. अन्य संशयितांवरही गुन्हे दाखल असल्याने पाेलिसांनी या अाठ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा, भारतीय हत्यार कायदा अादी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले अाहेत. जिल्हा पाेलिसप्रमुख संजय दराडे, अपर पाेलिस अधीक्षक हर्ष पाेतदार यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव शहर विभागाचे पाेलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी या गुन्ह्याचा तपास करत सबळ पुरावे जमा केले अाहेत. 


डाॅन बनण्याचा हव्यास
सुका पाचा हा शिवडी भागातील कुख्यात गँगस्टर म्हणून अाेळखला जाताे. त्याच्यावर खंडणी, धमकी देणे, मारहाण करणे, सावकारी व्यवसायातून अपहरण असे गंभीर २२ गुन्हे दाखल अाहेत. मागील पाच वर्षे ताे तुरुंगातच हाेता. अापली स्वत:ची टाेळी तयार करून गुन्हेगारीविश्वात डाॅन बनण्याचा त्याचा प्रयत्न हाेता. या हेतूनेच त्याने माेठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा लुटला असल्याचे तपासात समाेर अाले अाहे. 


तिघांनी दिली गुन्ह्याची कबुली 
यातील मुख्य संशयित अाराेपी सुका पाचा व दाेघांनी यापूर्वी केलेल्या अनेक गुन्ह्यांची कबुली दिली अाहे. सुकाने शिवडी भागातच अनेक गुन्हे केले अाहेत. तपासात या गुन्ह्यातील पुरावे जमा केले असून १४३ साक्षीदार बनविले अाहेत. भक्कम पुरावे हाती असल्याने या संशयितांवर कायद्याचा फास अावळला जाणार अाहे. 


बनावट कागदपत्रांचा वापर 
सुका पाचा याने अाधारकार्ड, मतदान कार्ड, अारसी बुक अशी बनावट कागदपत्रे तयार केली अाहेत. त्यामुळे बद्रीनुमाज, झमान, बदयू, जमाल, जमान, सुमित, सुका, ब्रिजवान, सुकाभाई पठाण, साहिल अकबर खान व बादशाह पाचा या वेगवेगळ्या नावाने सुका पाचा वावरत हाेता. हत्यारांची वाहतूक करण्यासाठी वापरलेल्या बाेलेराे कारची कागदपत्रेही बनावट हाेती. ही कार मुंबईतून चाेरी करण्यात अाली हाेती. 


नक्षली कनेक्शन नाही 
सुका पाचा याचा किंवा सापडलेल्या शस्त्रसाठ्याचे कुठलेही नक्षली कनेक्शन तपासात अाढळले नाही. सहा महिन्यांत तपास पूर्ण करून अाराेपपत्र सादर केले अाहे. गुन्हे सिद्ध हाेतील असे पुरावे मिळविले अाहेत. 
- गजानन राजमाने, पाेलिस उपअधीक्षक, मालेगाव 

बातम्या आणखी आहेत...