Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Darade wins by 167 votes

सत्ताबाजारात शिवसेनेच्या शेअरची उसळी; दराडे १६७ मतांनी विजयी

प्रतिनिधी | Update - May 25, 2018, 08:17 AM IST

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दर

 • Darade wins by 167 votes

  नाशिक- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादीच्या अॅड. शिवाजी सहाणे यांना तब्बल १६७ मतांनी धूळ चारत एकतर्फी विजय मिळविला. काँग्रेस अाघाडीच्या उमेदवाराला मतदानाच्या अादल्या दिवशी भाजपने दिलेला अघाेषित पाठिंबाही सेनेने कुचकामी ठरवत अापले वर्चस्व प्रस्थापित केले. दराडे यांना ३९९ तर सहाणे यांना अवघी २३२ मते मिळाली. दरम्यान, भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले क्रॉस वोटिंग निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरला.


  भाजपने ऐनवेळी सहाणेंना पाठिंबा दिल्याने त्यांची बाजू कागदावर वरचढ समजली जात होती. गतीमान राजकीय घडामाेडी अाणि जातीय समीकरणे बघता ही निवडणूक अतिशय चुरशीची हाेईल असा अंदाज हाेता. गतवेळी समसमान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे जयवंत जाधव यांना रात्री ११ वाजेच्या सुमारास विजयी घोषित केल्याचा अनुभव पाहता यंदाही निकालास विलंब लागण्याची शक्यता व्यक्त होत होती. प्रत्यक्षात गुरुवारी मतमोेजणीस सुरुवात झाल्यानंतर मतांची विभागणी करताच निकालाचे चित्र स्पष्ट होऊन अवघ्या दोन तासातच निकाल जाहीर झाला.


  'नोटा' अन‌् नाेटांचा बोलबाला
  संपूर्ण विधान परिषद निवडणुकीत सुरुवातीपासून मतमाेजणीपर्यंत 'नाेटा'चीच चर्चा हाेती. निवडणुकीत 'लक्ष्मी'दर्शनामुळे अनेक जण खूश हाेत हाेते तर काहींना दर्शनच न झाल्याने ते खट्टू झाले. दुसरीकडे मतदान करताना एकही उमेदवार मतदानाच्या पात्रतेचा नाही हे दर्शविण्यासाठीचा 'नाेटा'चा पर्याय देखील काेणी वापरला नाही. त्यामुळे या निवडणुकीत 'नाेटा' हाच सर्वांच्या अाैत्सुक्याचा विषय राहिला.


  सूक्ष्म नियोजन अन् आत्मविश्वास
  शिवसेनेची उमेदवारी मिळणारच हा ठाम विश्वास अाणि त्याचमुुळे दाेन वर्षांपासून मते जुळविण्याचे सुरू असलेले सूक्ष्म नियाेजन यातूनच नरेंद्र दराडे यांचा विजय दृष्टीपथात आला होता. निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वीच अापले सगळे गणित जुळून अाले असून ३९१ मते अापल्याला मिळतील हे त्यांनी केलेले सूतोवाच तंतोतंत खरे ठरले. जिल्हा बँकेमध्ये नरेंद्र दराडे अाणि त्यांचे बंधू किशाेर दराडे हे दाेघे संचालक म्हणून निवडून अाले अाणि बँकेचे अध्यक्षपदही दराडे यांनी मिळविले. यानंतर गेल्या दाेन वर्षांपासून विजयाचे सूत्रधार समजले जाणारे किशाेर यांनी जमवाजमवीला सुरूवात केली. सुरूवातीला शिवसेना अाणि भाजपचे संख्याबळ लक्षात घेता विजय अापलाच असल्याचे त्यांनी मनाशी ठाम मत बनविले हाेते. याच दरम्यान यवतमाळच्या पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे मानाचे पानही त्यांच्याकडे येत हाेते पण त्यांनी दीड महिना सर्वेक्षण करून हा विजय अवघड असल्याचे ताडले आणि अापण नाशिकचीच जागा लढविण्यास इच्छूक असल्याचे सांगितल्याचीही चर्चा हाेती. निवडणूक प्रत्यक्षात सुरू हाेताच दराडे यांचे समर्थक प्रत्येक तालुक्यात पेरले गेले हाेते. राेज खडानखडा माहिती त्यांना मिळत हाेती अाणि यातूनच याेग्य वेळी याेग्य ठिकाणी अचूक निर्णयाचे नियाेजन त्यांना करता अाले हे निवडणूक 'व्यवस्थापन'च त्यांना विजयाप्रत घेऊन गेले.

 • Darade wins by 167 votes

Trending