आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस्ट्रोच्या साथीने राहुडेत आणखी दोघांचा मृत्यू; जिल्ह्यात आत्तापर्यंत बळींची संख्या चारवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कळवणमधील महिलेचा गॅस्ट्रोने मृत्यू झाल्यानंतर आता सुरगाण्याच्या राहुडेतील आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. राहुडेत नामदेव गांगुर्डे यांचा मृत्यू झाल्यानंतर बुधवारी बशिरा लिलके आणि सीताराम पिठे या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या साथीने चार जणांचा बळी घेतल्याने प्रशासकीय यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीही राहुडेला भेट देऊन जिल्हा आरोग्य यंत्रणेस तत्काळ अहवाल सादरीकरणाचा आदेश दिला आहे. 


सविस्तर अहवाल देण्याचा आदेश 
जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यात घटना कशी घडली, कारणे, किती रुग्ण बाधित आहेत, किती मृत्यू झाले, किती वैद्यकीय पथके तैनात आहेत, पुरेसा औषधसाठा आहे का, साथीच्या आजाराबाबत आराखडा तयार आहे का, साथ पसरू नये यासाठी विभागाने जनजागृती केली आहे का याबाबत सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...