आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिसाळलेल्या कुत्र्याने बालकाला केले भक्ष्य, अाईवरही केला हल्ला; सिन्‍नरमधील हृदयद्रावक घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक, देवळाली कॅम्प - वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या झोळीत झोपलेल्या अवघ्या दीड वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्याने हल्ला करत त्याला भक्ष्य केले. झोळीत झोपलेल्या तान्हुल्याला पाजण्यास गेल्यानंतर त्या मातेच्या हा प्रकार लक्षात आला. कुत्र्याच्या तावडीतून सोडवताना आई गंभीर जखमी झाली. शनिवार (दि. १०) सकाळी वडगाव पिंगळा येथे ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. याप्रकरणी रविवारी (दि. ११) सिन्नर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव पिंगळा गावातील वीट भट्टीवर ऋषिकेश पवार आणि त्यांची पत्नी जनाबाई पवार हे काम करतात. त्यांना लक्ष्मी, राजेंद्र व कांचन अशी तीन अपत्य अाहेत. सकाळी कामावर जाताना जनाबाईने तान्हुला कांचन (वय दीड वर्ष) यास झोळीमध्ये झोपवले. काही वेळाने मुलगा झाेपेतून उठल्याने त्याला दूध पाजून येते, असे सांगत जनाबाई जात असताना झोळीमध्ये तिला हालचाल दिसली. त्यामुळे त्या धावतच झोळीजवळ पोहचल्या. तेव्हा लहानग्या कांचनचे कुत्रा लचके तोडत असल्याचे दिसले. कुत्र्याने जनाबाईवरही हल्ला केला. आरडाअोरड केल्याने कामगारांनी धाव घेत कुत्र्याला पिटाळले. गंभीर जखमी कांचन आणि मातेला बिटको रुग्णालयात हजर केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी कांचनला मृत घोषित केले.

 

पालिका हद्दीतील मोकाट कुत्र्यांचा उद्रेक
महापालिकेने पकडलेले मोकाट कुत्रे कर्मचारी शहराच्या लगत असलेल्या गावांमध्ये सोडतात. त्यांना भक्ष्य न मिळाल्याने ते कासावीस होतात अाणि नागरिकांवर हल्ले करतात. वडगाव पिंगळामध्येही शंभर ते दीडशे मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. यातील काही हिंस्त्र झाल्याने बालकांना भक्ष्य बनवत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...