आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कररचना कमी करून अन्य महसुली उत्पन्न वाढविल्यास नाशिकचा हाेईल विकास- डाॅ. निरगुडकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील ९०० पैकी ७२९ समाजमंदिरांचे करार नसणे, महापालिकेच्या १७३१ गाळ्यांचे कंत्राटे नसणे अाणि ९० टक्के गाळे महसुलाविना सुरू राहणे ही बाब नाशिकच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय घातक अाहे. सध्याची कररचना कमी करून अन्य महसुलांमध्ये वाढ केल्यास शहराचा निश्चितच विकास हाेईल, असा सल्ला न्यूज १८- लोकमतचे संपादक डाॅ. उदय निरगुडकर यांनी नाशिक सिटिझन फोरमच्या कार्यक्रमात दिला. विकास अाराखडा अाणि विकास नियंत्रण नियमावली यांची पालिकेच्या अर्थसंकल्पाशी सांगड घातली जाणार नाही ताेपर्यंत शहर गुलशनाबाद हाेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नगरसेवक शशिकांत जाधव व सतीश कुलकर्णी यांना कार्यक्षम नगरसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले.


सातपूरच्या नाईस संकुल सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अतिरिक्त संचालक भास्कर मुंढे होते. शहर विकासाचे मुद्दे पुढे येतात, तेव्हा प्रशासनाला व नगरसेवकांना जाब विचारण्यासाठी जनतेनेच पुढे यावे असे सांगत, डाॅ. निरगुडकर म्हणाले की, विकास अाराखडा अाणि विकास नियंत्रण नियमावलीच्या व्यवस्थित अंमलबजावणीतून नाशिक येत्या दहा वर्षांत ट्रॅकवर येईल. सुयाेग्य नियाेजनाअंती नाशिक केवळ भारतातील नाही तर अाशिया खंडातील सर्वाेत्कृष्ट शहर हाेऊ शकते. परंतु, त्यासाठी यापुढे काेणतेही अारक्षण व्यपगत हाेणार नाही याची काळजी घ्यावी लागणार अाहे. पुरस्कार निवड समितीचे सदस्य तथा 'दिव्य मराठी'चे डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी यांनी यावेळी पुरस्कार निवडीचे निकष सांगितले. सिटिझन फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग यांनी प्रास्ताविक तर नरेंद्र बिरार यांनी सूत्रसंचालन केले. व्हिनस वाणी, उमेश वानखेडे, सचिन अहिरराव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर 'क्रेडाई'चे माजी अध्यक्ष जितेंद्र ठक्कर, विक्रम सारडा, हेमंत राठी उपस्थित होते.


काेणाला मिठी मारावी हे हुशार माणसांनाच कळते : डाॅ. निरगुडकर
हुशार माणसे राजकारणात येणे गरजेचे अाहे, असे भास्कर मुंढे यांनी सांगितल्यानंतर त्यास प्रत्युत्तर देताना 'राजकारणी हुशार असतात म्हणूनच ते राजकारणात येतात अाणि टिकून राहतात', असा टाेला डाॅ. निरगुडकरांनी लगावला. हुशार माणसांनाच काेणाला कधी मिठी मारायची अाणि काेणाला डाेळा मारायचा हे कळते, असे सांगत राहुल गांधींनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र माेदींशी केलेल्या वर्तनाची अाठवण त्यांनी करून दिली. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.

 

बातम्या आणखी आहेत...