आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचारी संपामुळे बसस्टॅण्ड अाेस, नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस संप पुकारल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. अनेक प्रवाशांनी प्रवासासाठी रेल्वेला पसंती दिल्याने शनिवारी (दि. ९) नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी उसळली हाेती. तर नाशिकमधील सीबीएस व ठक्कर बाजार बसस्थानक अाेस पडले हाेते.

 

राज्यात एस. टी. कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी संप पुकारल्याने दोन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय सुरू आहे. संपाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नागरिकांनी रेल्वेने प्रवास करण्यासाठी पसंती दिली होती. यामध्ये बहुतांश प्रवासी हे मुंबई, मनमाड, औरंगाबाद, जळगाव येथे जाणारे होते. औरंगाबादला जाण्यासाठी बससेवा बंद असल्याने प्रवाशांनी तपोवन एक्स्प्रेसने औरंगाबादला जाण्यासाठी गर्दी केली होती. तर मनमाड, येवला, शिर्डी येथे जाणाऱ्या प्रवाशांनी मनमाडपर्यंत रेल्वेने प्रवास करून पुढे खासगी वाहनांनी प्रवासासाठी पसंती देऊ असे सांगितले.


तर महामार्गावरून मुंबईसाठी जाणाऱ्या बससेवाही बंद असल्याने अनेकांनी पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेसने प्रवास केला. त्यामुळे रेल्वेस्थानकामध्ये शनिवारी सकाळी प्रवाशांची गर्दी झाली होती. तर शहर बसेसदेखील बंद असल्याने येणाऱ्या प्रवाशांना रिक्षा, टॅक्सीने प्रवास करावा लागत होता. यामुळे काही रिक्षाचालकांनी याचाही लाभ उठवत दरात वाढ केली होती. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने बससेवा ठप्प झाली असून, एरवी प्रवाशांनी फुललेले मध्यवर्ती बसस्थानक शनिवारी असे अाेस पडले हाेते.

बातम्या आणखी आहेत...