आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Earthquake: नाशिकमध्ये 2.7 तीव्रतेचा भूकंप..पेठ तालुक्यात 100 सेकंद जाणवले सौम्य धक्‍के

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-  पेठ तालुक्यातील गोंदे व भायगांव परिसराला आज मंगळवारी सकाळी 7 वाजुन 43 मिनिटांदरम्‍यान भुकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्‍टर स्‍केलवर या भुकंपाची तीव्रता 2.7 एवढी नोंदवण्‍यात आली आहे. धक्क्यामुळे काही काळ घरातील भांडी वाजत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने भुकंपाचे धक्‍के सौम्‍य असल्‍याने कुठलीही वित्‍त व जिवित हानी झाली नाही. 

 

महाराष्‍ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्‍थेच्‍या (MERI) केंद्रात या भुकंपाची नोंद करण्‍यात आली आहे. नाशिककपासुन 32 कि.मी. अंतरावर 100 सेकंद भुंकपाचे धक्के बसल्याचे MERI तर्फे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.


नागरिकांना वारंवार जाणवतात भुकंपाचे धक्‍के 
काही वर्षांपुर्वी गोंदे गावाजवळील दमणगंगा नदीतील खडकांना भुकंपामुळे भेगा पडल्‍या होत्‍या. यामुळे या नदीवरील आमदा डोहातील पाणीपातळी घटली होती. त्यानंतर अनेकदा भुकंपाचे धक्‍के जाणवल्‍याचे स्थानिक नागरीकांनी सांगितले आहे. आजपर्यंत झालेल्या मोजक्‍याच धक्क्यांची नोंद महाराष्‍ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्‍थेच्‍या (MERI) भुकंपमापन यंत्रात झाली आहे. अनेक धक्क्यांची नोंद तेथे झालेली नाही. मात्र हे धक्के वारंवार जाणवतात, अशी माहिती स्‍थानिक नागरिकांनी दिली आहे. 


घटनास्‍थळी पथक रवाना 
आज सकाळी भायगावच्या सरपंच श्रीमती शेवंताबाई भोंडवे व गोंदे येथील कुमार माळगावे यांनी फोन करून तहसिलदार हरिष भामरे यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी मंडल अधिकारी व तलाठी यांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...