आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकातील गोंदे-भायगाव परिसराला भूकंपाचा धक्का; परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पेठ तालुक्यातील गोंदे, भायगाव परिसरात मंगळवारी सकाळी ७ वाजून ४३ मिनिटे ११ सेकंदांनी २.७ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. यामुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. या धक्क्याने काहीकाळ घरातील भांडी वाजत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. याबाबतची माहिती सरपंच शेवंताबाई भोंडवे यांच्याकडून मिळाल्याचे तहसीलदार हरिष भामरे यांनी सांगितले. 


मागील काही वर्षांपासून गोंदे-भायगाव परिसराला भूकंपाचे धक्के बसत अाहेत. काही वर्षांपूर्वी गोंदे गावाजवळील दमणगंगा नदीतील खडकासह वृक्षांना भेगा पडून त्या नदीवरील आमदा डोहातील पाणीपातळी घटली होती. त्यानंतर असे अनेकदा धक्क्यांचे अनुभव स्थानिक नागरिकांना आले. आजपर्यंत झालेल्या काही धक्क्यांची नोंद मेरीच्या भूकंपमापन यंत्रात झाली. मात्र, अनेक धक्क्यांची नोंद तेथे झालेली नाही. स्थानिक नागरिकांना हे धक्के वारंवार जाणवतात. मंगळवारी सकाळी झालेल्या धक्क्याची नोंद मेरीच्या भूकंपमापन केंद्रात झाली अाहे. नाशिकपासून ३२ किलाेमीटरवर २.७ रिश्टर स्केलचा १०० सेकंद धक्का बसल्याचे मेरीतून अधिकृतपणे सांगण्यात येते. आपत्ती नियंत्रण कक्षातील दूरध्वनी चार दिवसापूर्वी नादुरुस्त होता. दोन दिवसापासून आपत्ती नियंत्रण कक्षातील दूरध्वनी (२२५५३१) हा पुन्हा सुरू झाला असल्याचे निवासी नायब तहसीलदार नवले यांनी स्पष्ट केले. 


धक्के साैम्य हाेते 
भायगावच्या सरपंच शेवंताबाई भोंडवे व गोंदे येथील कुमार माळगावे यांनी भ्रमणध्वनीवरून भूकंपाबाबत माहिती दिली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी मंडल अधिकारी व तलाठ्यांचे पथक रवाना करण्यात आले. त्यांनी दिलेल्या अहवालात कुठलीही वित्त व जीवितहानी झालेली नाही. शिवाय हे धक्के सौम्य होते. 
- हरिष भामरे, तहसीलदार, पेठ 

बातम्या आणखी आहेत...