आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अठरा लाख ठेवीदारांना 7500 कोटींचा गंडा; मुंबईच्या लोअर परळमधून संचालक अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विविध राज्यांमधील गुंतवणूकदारांची सुमारे ४५०० कोटी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या सिट्रस चेक इन लिमिटेड आणि रॉयल टि्वंकल स्टार क्लब या कंपन्यांचा मुख्य संचालक असलेल्या ओमप्रकाश गोयंकाला नाशिकच्या ग्रामीण पोलिस दलाच्या  आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. रविवार मुंबई येथील लोअर परळ भागात ही कारवाई करण्यात आली.

 

सुमारे दोन कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी या कंपन्यांवर लासलगाव पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस या कंपनीची चौकशी करत होते आणि गोयंकाच्या मागावर होते. तब्बल ४ महिन्यांनंतर तो पोलिसांच्या हाती लागला.   
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सिट्रस चेक इन लिमिटेड आणि रॉयल टि्वंकल  स्टार क्लब या दोन्ही कंपन्यांचा मुख्य संचालक असलेला ओमप्रकाश बसंतलाल गोयंका आणि इतर संचालक तसेच कंपनीच्या प्रतिनिधींनी संगनमत करून वेगवेगळ्या माध्यमातून आधी परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन केला.

 

विविध योजनांतर्गत आकर्षक फायदा होण्याचे अामिष देत त्यांना कंपनीकडून चालवल्या जात असलेल्या विविध योजनांमध्ये गुंतवणूकर करण्यास भाग पाडले.  या नागरिकांकडून त्यांच्या विविध योजनांमध्ये ठेवी जमा करून घेतल्या. वास्तविक, बँक नियमांप्रमाणे ठेवीच्या बदल्यात पुराव्याशी संबंधीत काही कागदपत्रे ठेवीदारांना मिळायल्या हवीत. मात्रद्व कुठल्याही कागदपत्रांची पूूर्तता न  करता ठेवी स्वीकारत  कच्च्या पावत्या दिल्या. या दोन्ही कंपन्यांत विविध योजनांतर्गत सुमारे १ कोटी ८४ लाख ५५ हजारांच्या ठेवी घेत मुदत संपल्यानंतरही गुंतवणूकदारांना त्याचा परतावा दिला नाही.

 

याप्रकरणी लासलगाव पोलिसांत २८ फेब्रुवारी २०१८ रोजी गोयंकासह इतर संचालकांच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित संचालकांच्या विरोधात  महाराष्ट्र ठेवीदारांच्या  हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमांतर्गत या गुन्ह्याची नोंद झाली होती. दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक वास्तव पुढे आले. या कंपन्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील सुमारे १८ लाख ठेवीदारांकडून विविध आर्थिक  प्रलोभन देत  तब्बल ४५०० कोटींची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. कंपनीला या गुंतवणूकदारांचे ७५०० कोटी रुपये देणे आहे.  


मुंबईच्या लोअर परळमधून अटक  
ठेवीदारांच्या तक्रारीनंतर मागील ४ महिन्यांपासून पोलिस गोयंकाचा शोध घेत होते. मात्र, त्याचा शोध लागत नव्हता. ग्रामीण पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा  तपास सुरू होता. दरम्यान, नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेचे  उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख, निरीक्षक जालिंदर पळे यांनी लोअर परळमधून गोयंकाला  अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता ३० मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...