आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

38 टेरेस हाॅटेल्सला अतिक्रमणाच्या नाेटिसा; अाठवड्यात पडणार हाताेडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.

नाशिक - शहरातील ३८ टेरेस हाॅटेल्स अतिक्रमीत असल्याच्या कारणावरून नगररचना विभागाने संबंधित हाॅटेलमालकांना नाेटिसा बजावल्या अाहेत. यात सर्वाधिक १६ हाॅटेल्स नाशिक पश्चिम विभागातील अाहेत. संबंधित हाॅटेलचालकांनी अाठवडाभरात अतिक्रमणे स्वत:हून काढून न घेतल्यास प्रशासनाच्या वतीने अतिक्रमणे जमीनदाेस्त करण्यात येणार अाहेत. शिवाय नियमानुसार संबंधितांकडून दांडगा दंडदेखील वसूल केला जाणार अाहे.

 

अलिकडेच मुंबईतील कमला मिल येथे 'रुफ टाॅप' रेस्टाॅरंटला लागलेल्या आगीत १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला हाेता. या दुर्घटनेनंतर शहरातील अनधिकृत हॉटेल, रेस्टाॅरंटचा मुद्दा चर्चेत आला आहे. 'दिव्य मराठी'नेही शहरात सर्वेक्षण करून टेरेसवर विनापरवाना व धोकादायक स्थितीत चालू असलेल्या हॉटेल्सच्या कारभारावर प्रकाश टाकला होता. विशेष म्हणजे, या ठिकाणी अग्निशामक दलाची कोणतीही परवानगी नव्हती वा अग्निशामक यंत्रणेचाही पत्ता नसल्याचे पुढे अाले हाेते. दुसरी बाब म्हणजे, अनेक ठिकाणी अपेक्षेनुसार अापत्कालिन मार्ग नव्हता. केवळ लिफ्टद्वारे येण्या-जाण्याची व्यवस्था होती. या संदर्भात नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर टेरेस वा बेसमेंटमध्ये हॉटेल वा रेस्टारंटना परवानगीच दिलेली नसल्याचे त्‍यांनी सांगितले.

 

परवानगी घेतलेली नाही
अग्निशमन विभाग : टेरेसवर थाटलेल्या एकही हॉटेलने आग प्रतिबंधक उपाययोजनेसंबंधी परवानगी घेतलेली नाही
नगररचना विभाग : एकाही हॉटेलला नगररचना विभागाने परवानगी दिलेली नाही
अतिक्रमण निर्मूलन विभाग : टेरेस हाॅटेलची अतिक्रमणे काढण्यास अाठ दिवसात सुरुवात हाेईल.

 

तातडीने हटविली जाणार हॉटेलची अतिक्रमणे
टेरेस हाॅटेलसंदर्भात नगररचना विभागाचा सर्व्हे प्राप्त झाला अाहे. अतिक्रमण निर्मूलन विभागानेही संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. मुदतीत संबंधितांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम हटवले नाही तर तातडीने कारवाई केली जाईल.
- रोहिदास बहिरम, उपआयुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग

 

या हाॅटेल्सना नाेटिसा
नाशिक पश्चिम : काॅलेजराेडवरील एम. डी. सफायर हाॅटेल अॅण्ड बार, रुफ टेक हाॅटेल, बिग बजारजवळील एंटर टू ड्रॅगन, माॅडेल काॅलनी येथील फर्माइश, थत्तेनगर येथील प्लेअर अॅण्ड बार, गंगापूरराेडवरील व्हायटेक्स हाॅटेल अॅण्ड बार, राका काॅलनी येथील पतंग, शरणपूर लिंकराेडवरील याहू, पंडित काॅलनीतील काेपा कबाना, शरणपूरराेडवरील मनाेरथ, कुलकर्णी उद्यानासमाेरील २१ सेंच्युरी, मुंबई नाका भागातील बार्बेक्यू बिस्ट्राे, कालिका मंदिराशेजारील हॅपी नाशिक टाईम्स, जुना त्र्यंबक नाका येथील टाॅक अाॅफ द टाऊन, पाटील प्लाझा येथील डी सेलर टेरेस हाॅटेल, जुना अाग्राराेडवरील सम्राट या हाॅटेल्सना नाेटिसा बजावण्यात अाल्या अाहेत.
पंचवटी : मालेगाव स्टॅण्डवरील न्यू पंजाब, नांदूर नाका परिसरातील प्रेस्टिज पाॅइंट, मजा, अाैरंगाबादराेडवरील कारवा, म्हसरूळ-मखमलाबाद चाैफुली परिसरातील राऊ या हाॅटेल्सना नाेटिसा देण्यात अाल्या.
नाशिकराेड : सुभाषराेड येथे श्रद्धा, सुभाषराेड रेल्वेस्टेशनजवळील नालंदा, सैलानी बाबा स्टाॅपजवळील स्काय बार, रेजिमेंटल प्लाझासमाेरील गायकवाड क्वालिटी फूडस यांना नाेटिसा दिल्या.
नाशिक पूर्व : नाशिक-पुणे महामार्गावरील हाॅटेल कामत
सिडकाे : त्रिमूर्ती चाैक परिसरातील शिवसागर, सुयाेग, साई राजदरबार, न्यू पद्मा, पाथर्डी लिंकराेड येथील साई विजय, मुंबई महामार्गावरील पाेर्टिगाे सराेवर, हेमराज, पाथर्डी परिसरातील द पाल्म, वडनेर रस्त्यावरील सेलिब्रेशन, पाथर्डी फाटा परिसरातील ग्रॅण्ड अश्विन, ग्रॅण्ड अश्विन एन. एस. या हाॅटेल्सना नाेटिसा बजावण्यात अाल्या अाहेत.

बातम्या आणखी आहेत...