आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतफुटीची भाजपसह, राष्ट्रवादीतर्फे चाैकशी; मुख्यमंत्र्यांपर्यंत पाेहाेचविला जाणार अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, मनसे महाअाघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर मते नेमकी कशी फुटली अाणि घरभेदी काेण अाहे याची चाैकशी करण्यासाठी भाजप अाणि राष्ट्रवादीने पक्षीय पातळीवर चाैकशी सुरू केली अाहे. भाजपचा अहवाल विभागीय संघटनमंत्री किशाेर काळकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पाेहाेचविण्यात येणार अाहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील   स्वत: चाैकशी करणार असल्याचे सांगितले जाते. 


विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक म्हणजे २०७ मतदार असले तरीही काँग्रेस।, राष्ट्रवादी, मनसेला अखेरच्या दिवशी भाजपचीही साथ मिळाल्याने हे संख्याबळ ३४४ इतके झाले हाेते. त्यामुळे राष्ट्रवादीचे अॅड. शिवाजी सहाणे हे सहजपणे निवडून येतील असा अंदाज लावला जात असताना प्रत्यक्षात शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी त्यांचा तब्बल १६७ मतांनी पराभव केला. दराडे यांना ३९९ तर अॅड. सहाणे यांना २३२ मते मिळाली. म्हणजेच तब्बल ११२ मते फुटल्याचे स्पष्ट झाले. ही मते कशी फुटली याबाबत अाता संबंधित पक्षाच्या प्रमुखांनी चाैकशीचे अादेश दिले अाहे. 


फडणवीसांपर्यंत जाणार सविस्तर अहवाल 
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडे १६७ इतकी मते हाेती. मतदानाच्या अादल्या दिवशी महामार्गावरील ज्युपिटर हाॅटेल येथे विभागीय संघटनमंत्री किशाेर काळकर यांनी भाजपच्या मतदारांच्या तालुकानिहाय बैठका घेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे सूचित केले हाेते. तरीही पक्षातील एका माेठ्या गटाने अॅड. सहाणे यांच्या विराेधात प्रचार करीत दराडेंच्या बाजूने काैल दर्शविला. निवडणुकीचा निकाल बघता भाजपचे सर्वाधिक नगरसेवक जेथे अाहे तितकी मतेही अॅड. सहाणे यांना मिळालेली नाही. नाशिक महापालिकेतही काही वेगळी परिस्थिती नाही. वास्तविक, भाजपच्या पाठिंब्यामुळे अॅड. सहाणे हे निश्चिंत झाले हाेते. या पार्श्वभूमीवर भाजपचे संघटनमंत्री अाता संपूर्ण निवडणुकीचा अाढावा घेणार असून त्यात उमेदवाराच्या पराभवाची कारणे शाेधून काढण्यात येणार अाहे. विराेधी उमेदवाराचा प्रचार करणाऱ्यांचीही नावे अहवालाद्वारे मुख्यमंत्र्यांपर्यंत पाेहाेचविली जाणार अाहे. 


राष्ट्रवादी अन्य पक्षांची घेणार माहिती 
राष्ट्रवादीची १०० मते हाेती. ही मते फुटल्याची चर्चा हाेती. भुजबळ गटाने विराेधात प्रचार केल्याचे बाेलले गेले. या दाव्यांमध्ये तथ्य अाहे का, अन्य पक्षांची किती मते मिळालीत, काँग्रेसची किती अाणि कुठली मते फुटली याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राजेश टाेपे हे चाैकशी करणार असल्याचे बाेलले जात अाहे. 


काँग्रेसचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे 
काँग्रेसची ७५ मते अॅड. सहाणे यांना मिळाली नसल्याचा दावा केला जात अाहे. विशेषत: मालेगावसह ग्रामीण भागातील मते फुटल्याचे बाेलले जात अाहे. या प्रकरणाची चाैकशी शहर अाणि ग्रामीण काँग्रेसकडून केली जाणार अाहे. याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठविणार असल्याचे शहराध्यक्ष शरद अाहेर यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...